मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – स्टार प्रवाहवर सुरु होणाऱ्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील मालिका सुरु होत आहे या मालिकेतून महामानवाचा बालपणापासूनचा प्रवास पाहायला मिळेल.या मालिकेचे दमदार शीर्षकगीताचं मेकिंग समोर आलं आहे. हे शीर्षकगीत आदर्श आणि उत्कर्ष शिंदे या जोडीने लिहिलं असून संगीतही त्यांनीच दिल आहे.
येत्या १८ मे रोजी बुद्ध पौर्णिमेपासून स्टार प्रवाहवर ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिका सुरु होत त्यात सागर देशमुख डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारणार आहे.
शीर्षकगीताचे बोल …
‘क्रांतिसूर्य तू – शिल्पकार तू भारताचा, बोधिसत्व मूकनायका
मोडल्या रुढी – त्या परंपरा- दिव्यतेजा, तूच सकल न्याय दायका
जीवन तुझे आम्हास प्रेरणा, दाही दिशा तुझिच गर्जना
भीमराया माझा भीमराया, आला उद्धाराया माझा भीमराया
भारताचा पाया माझा भीमराया’…..