नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी यंदाच्या वर्षी मराठा आरक्षण लागू होणार नसल्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती .तेथे स्पेशल लीव्ह पिटिशनवरील सुनावणी बुधवारी तहकूब करण्यात आली त्यांनतर आज त्याच्यावर सुनावणी होणार आहे.
पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाचे अद्यापपर्यंत किती प्रवेश झाले, याची आकडेवारी सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले असून, पुढील सुनावणी गुरुवारी होणार आहे.
‘नीट ’ परीक्षेच्या निकालानंतर राज्य सरकारच्या अख्यत्यारीत असलेल्या जागांसाठी अर्ज मागवण्यात आले, त्या दिवसापासून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली, असे गृहीत धरण्यात यावे. त्यामुळे मराठा आरक्षण पूर्वलक्षीप्रभावाने लागू झाले, असा हायकोर्टाने दिलेला निर्वाळा अयोग्य असल्याचा दावा याचिकेत केला आहे.