बहुजननामा ऑनलाईन टीम – मुसलमानांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य साध्वी प्रज्ञानंतर आता विश्व हिंदू परिषदेची नेता साध्वी प्राची यांनीही केले आहे. हिंदूंनी केवळ हिंदू विक्रेत्यांकडून कावड विकत घ्यावा मुसलमान विक्रेत्यांकडून कावड विकत घेऊ नये असे आवाहन साध्वी प्राची यांनी हिंदूंना केले आहे. साध्वी प्राची यांनी याआधीही अनेक आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.
कैराना येथे काही दिवसांपूर्वीच समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी आमदार नाहिद हसन यांनी हिंदू विक्रेत्यांवर बहिष्कार टाकत वक्तव केले होते की, “हिंदूंच्या दुकानातून कोणताच माल विकत घेऊ नका”. याच पार्श्वभूमीवर बागपत येथे साध्वी प्राची यांनी कावड परिषदेत मुसलमानांवर सडकून टीका केली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले ‘ हरिद्वारमध्ये ९९ टक्के कावड विक्रेता हे मुसलमान आहेत. मी हिंदूंना आवाहन करते की या कावड विक्रेत्यांकडून कावड विकत घेऊ नका. यामुळे हिंदूंचे विक्रेते निर्माण होतील आणि हिंदूंना रोजगारही मिळेल. यावेळी त्यांनी कैराना येथील नाहिद हसन यांच्या वक्तव्यावरही टीका केली आहे.
हिंदूंसाठी हिंदुस्थान हा त्यांचा देश आहे तसाच मुसलमानांचाही आहे असेही प्राची यांनी सांगितले. “भारत हा हिंदूंचा देश आहे, अगदी तसाच मुसलमानांचाही देश आहे. फक्त एवढीच अपेक्षा आहे की हिंदू आणि मुसलमानांनी एकोप्याने आणि माणुसकीने राहायला हवे. असे न करता जर तुम्ही चोरी करून वर शिरजोरी कराल तर ते अजिबातच सहन केले जाणार नाही. आम्ही महात्मा गांधी नाही.”