नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारत दौऱ्यावर असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे स्वागत केले. ट्रम्प यांच्यासोबत त्यांची पत्नी मेलानियाही आहेत. यादरम्यान मोदी, ट्रम्प आणि मेलानिया यांच्यासोबत एक महिला दिसत असून तिची चर्चा होत आहे.
या महिलेचे नाव गुरदीप कौर चावला असून ती मोदींसाठी इंटरप्रिटरचे काम करते. गुरमीत कौर या सध्या अमेरिकन ट्रान्सलेटर असोसिएशनच्या सदस्य आहेत.
जेव्हाही कधी मोदी परदेशी दौऱ्यावेळी हिंदीत भाषण करतात तेव्हा गुरदीप या त्याचे इंग्रजीत भाषांतर करतात. इतकेच नाही तर गुरदीप या मोदींसोबत भारतात परदेशी नेत्यांच्या दौऱ्यादरम्यानही दिसून आल्या आहेत. मोदींनी हिंदीत भाषण दिल्यानंतर गुरदीप या जागतिक नेत्यांना त्यांचे भाषण समजेल असे भाषांतर करतात.
संसदमधून सुरु केले होते करियर
१९९० मध्ये गुरदीप यांनी भारताच्या संसदेत आपले करियर सुरु केले होते. पण नंतर त्यांना आपल्या पतीसोबत अमेरिकेला शिफ्ट व्हावे लागले होते. २०१० साली अमेरिकेच्या माजी राष्ट्रपतींसह इंटरप्रिटर म्हणून भारतात दौऱ्यावर आल्या होत्या. गुरदीप यांनी २०१४ मध्ये मेडिसन स्क्वेअर गार्डन येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. त्यात त्यांनी अनुवादकाचे काम केले होते. तेथूनच त्या मोदींसोबत वॉशिंगटन डीसीला गेल्या, जिथे मोदी आणि बराक ओबामा यांच्यातील इंटरप्रिटरचे काम केले होते.
सगळ्या भाषांचे आहे ज्ञान
गुरदीप यांना सगळ्या भाषांचे ज्ञान असून त्यांना एक उत्तम ट्रान्सलेटर म्हणून ओळखले जाते. जेव्हा पण मोदी परदेश दौर्यावर असतात तेव्हा ते तेथील भाषेत लोकांना जोडतात. गुरदीप चावला मोदींच्या अनेक परदेश दौर्यावर दिसल्या आहेत.