मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – कुख्यात गँगस्टर एजाज लकडावाला याच्या चौकशी दरम्यान मुंबई पोलिसांना खळबळजनक माहिती मिळली आहे. विशेष म्हणजे अंडरवर्ल्ड डॉन दाऊदला ठार करण्याबाबतची एक माहिती त्याने उघड केली आहे. लकडावाला स्वत: एकेकाळचा दाऊदचा जवळचा सहकारी असल्याचं पोलिसांनी सांगितले.
एका इंग्रजी दैनिकाने दिलेल्या माहितीनुसार मुंबई पोलिसांच्या चौकशीत हा खळबळजनक खुलासा उघड झाला आहे. ५० वर्षीय लकडावाला सुमारे २० वर्ष पोलिसांना चकवा देत होता. त्या काळात लकडावालाने देशभरात खंडणीचे रॅकेट सुरू करण्यासाठी स्वत: ची टोळी तयार केली. दाऊदची साथ सोडत त्याने छोटा राजनसोबत काम सुरु केले. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात बनावट पासपोर्ट प्रकरणात मुलगी शिफाला अटक केल्यानंतर तो मुंबई पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
दाऊदला ठार करण्याचा कट
कुख्यात गॅंगस्टर एजाज लकडावाला यांच्या चौकशीत मुंबई पोलिसांना खळबळजनक माहिती मिळाली आहे. छोटा राजनचा मुख्य विश्वासू सहकारी विकी मल्होत्राच्या साथीने आम्ही १० जण कराचीतल्या दर्ग्याबाहेर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला ठार करण्यासाठी वाट बघत होतो. ही घटना १९९८ मधील आहे. काही दिवसांपूर्वीच लकडवालाला मुंबई पोलिसांनी पटणाहून लकडावालाला अटक केली. त्याच्या चौकशीत हा खुलासा झाला आहे.
भारतीय गुप्तचर यंत्रणेच्या आशीर्वादाने छोटा राजनने मुलगी मारियाच्या निधनानंतर दाऊदला संपवण्याचा प्रयत्न केला. विकीच्या नेतृत्वात मी टीमचा एक सदस्य होतो, ज्यात फरीद तानाशा, बाळू डोकरे, विनोद मटकर, संजय घाटे आणि बाबा रेड्डी यांचा समावेश होता, आम्ही एका दर्ग्याच्या बाहेर तळ ठोकला जेथे दाऊद आपल्या मुलीसाठी काही धार्मिक विधी करण्यासाठी येणार होता, एजाज लकडावालाने पोलीस चौकशीत सांगितले की, नेपाळमधील खासदार मिर्झा दिलशाद बेग यांनी अखेरच्या क्षणी डी-कंपनीला ही माहिती दिली. त्यामुळे शेवटच्या मिनिटाला आमचा प्रयत्न अयशस्वी ठरला. नाना (छोटा राजन) इतका संतापला होता की त्याने त्याच वर्षी बेगचा खून केला होता असे लकडावाला यांनी पोलिसांना सांगितले.
लकडावालावर ६ वेळा गोळ्या झाडण्यात आल्या
गुन्हे शाखेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, 2002 मध्ये दाऊद आणि छोटा शकीलमध्ये झालेल्या बेबनावामध्ये लकडावालाचा जीव थोडक्यात बचावला होता. आतापर्यंत लकडावालावर ६ वेळा गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. हल्ल्यानंतर सहकारी सलीम पेनवाला याने लकडावालाशी संपर्क साधला त्याने अजमेर येथील तावीज बांधायला सांगितले. शकीलचे लोक पेनवालाचा पाठलाग करतील या भीतीने मी त्याला भेटण्यापासून सावध केले होते. त्याला भेटण्यासाठी माझ्या बायकोला पाठविले. पेनवाला भेटल्यानंतर मी तिला थेट घरी न येण्यास सांगितले. पण, ती त्याबद्दल विसरली आणि घरी परतली, त्यामुळे शकीलला माझा ठावठिकाणा लागला. तावीज मिळाल्यानंतर दोन दिवसांनी माझ्यावर हल्ला झाल्याचं लकडावालाने सांगितले. लकडावालाची चौकशी अशीच सुरु राहणार असल्याचं पोलिसांनी सांगितले.