अहमदनगर : बहुजननामा ऑनलाईन – महिलेचा गर्भपात करून त्या अर्भकाचे निर्घृणपणे पाच तुकडे केल्याची घटना अहमदनगरमध्ये घडली आहे. यापृकरणी डॉक्टरी पेशाला कलंक लावणार्या आरोपी डॉ शंकरप्रसाद उर्फ सुनील गंधे याला बेड्या ठोकण्यात आल्या आहे.
जखणगाव यातील गंधे सर्जीलकल हॉस्पिटलमध्ये गर्भपात झाल्याची माहिती अहमदनगर पोलीस अधीक्षक अखिलेश सिंह यांना मिळाली. त्यांनाही गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरणबीकर यांना माहिती दिली. डॉक्टरांच्या पथकाने हॉस्पिटलमध्ये जाऊन कारवाई केली. कारवाई दरम्यान आरोपी डॉ.शंकरप्रसाद उर्फ सुनील गंधे यांनी त्या महिलेचा गर्भपात करून त्या अर्भकाचे निर्घृणपणे पाच तुकडे केल्याचे समोर आले. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
जेव्हा दवाखान्यामध्ये चौकशी केली त्या वेळेस एक स्त्री नुकताच गर्भपात करण्यात आलेला होता, त्या महिलेशी विचारना केली असता तीन मुली असल्याचे तिने सांगितले मग चौथ्यांदा मुलगी असावी या शंकेने गर्भपात केला का या बाबत शंका निर्माण झाली. त्यावेळेस त्याच्याकडे असलेले कागदपत्र सोनोग्राफी केलेलं डॉक्टर कर्डीले यांच्याकडेच सोनोग्राफीचा रिपोर्ट होता. त्या रिपोर्टमध्ये सतरा आठवडे अधिक दोन दिवस गर्भाची वाढ झाल्याचे नमूद केले होते.