नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एकेकाळी बिहार पोलिसात एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जाणारे माजी डीएसपी कृष्णा चंद्र यांनी आपल्या घरात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वीच्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी आपली मानसिक उदासीनता आणि शेजारील व्यक्तीला यासाठी जबाबदार धरले. दरम्यान, के चंद्र यांना बिहार पोलिसातील बहादूर अधिकाऱ्यांमध्ये गणले जात होते. आपल्या 37 वर्षांच्या नोकरीमध्ये त्यांनी 60 पेक्षा जास्त एन्काउंटर केले होते. सेवानिवृत्त झाल्यानंतर ते आपल्या कुटुंबासमवेत पटना येथे वास्तव्यास होते. पटणा पोलिसांना आत्महत्येची बातमी समजताच एकच खळबळ उडाली, ज्यानंतर बऱ्याच अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत स्वतः प्रकरणाचा तपास केला.
के चंद्र पटनातील बेउर पोलिस स्टेशन परिसरातील मित्रमंडली कॉलनी फेज – 2 मधील त्यांच्या खासगी घरात राहत होते. आत्महत्येपूर्वी त्यानी दोन पाने सुसाइड नोटही लिहून ठेवली होती, जी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले की, गेल्या 16 वर्षांपासून माझ्यावर उपचार सुरू होते. मानसिक नैराश्यामुळे मी कित्येक महिने झोपलेलो नाही आणि आता शेजार्यामुळे माझ्या नैराश्यात वाढ झाली आहे, ज्यामुळे त्याला आत्महत्येसारखे पाऊल उचलण्यास भाग पाडले गेले आहे.
आत्महत्येबद्दल त्यांनी पत्नी व मुलांची माफी मागित लिहिले की, याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कोणताही मार्ग उरला नव्हता. आपल्या दुसर्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी मुलाला संबोधित करत त्यांच्या मृत्यूनंतर काय करावे हे लिहिले आहे. माजी डीएसपीच्या मुलाने सांगितले की, पाणी साचण्याच्या समस्येमुळे ते नाराज होते आणि मनपाच्या दुर्लक्षामुळे त्यांनी स्वत: ला गोळी घातली.