नवी दिल्ली : वृत्त संस्था:देशात आता सणासुदीला सुरुवात होत आहे. अशात ऑनलाईन शॉपिंगवर(Online Shopping) मोठ्या प्रमाणात सूट दिली जात आहे. तुम्ही देखील अशा शॉपिंगचा(Online Shopping) विचार करत असाल तर तुम्हाला थोडी काळजी घ्यावी लागणार आहे. यासाठी आपण काही महत्त्वाच्या शॉपिंग टीप्स जाणून घेणार आहोत.
कॅश ऑन डिलिव्हरी पर्याय सर्वात सुरक्षित
ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी तुम्ही सीओडी म्हणजेच कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय निवडू शकता. यामुळं तुम्हाला आधी वस्तू ताब्यात मिळते.
ATM कार्डची माहिती शॉपिंग साईटवर सेव्ह करू नका
अनेकजण आपल्या एटीएम कार्डची माहिती शॉपिंग साईटवर सेव्ह करतात. मात्र तुम्ही अशी चूक कधीही करू नका. ऑनलाईन पेमेंट करताना Save Card Detail या पर्यायावर नो क्लिक करा. यामुळं बँक खातं सुरक्षित राहिल.
वेबसाईटचा URL नक्की तपासा
URL मध्ये http ऐवजी https असायला पाहिजे. एस म्हणजे गुगलनं ते सिक्योर्ड केलं आहे. यामुळं तुमची फसवणूक होत नाही.
बनावट वेबसाईट पासून सावध रहा
हॅकर्स बनावट वेबसाईट किंवा मोबाईल अॅप तयार करून लोकांना टारगेट करत आहेत. त्यामुळं कोणत्याही साईट किंवा अॅपवर खरेदी करण्यापूर्वी त्याबद्दल माहिती घ्या. यामुळं तुमची ऑनलाईन फसवणूक होणार नाही.