बहुजननामा ऑनलाइन टीम – हॉलिवूड सुपरस्टार जॉनी डेप (Johny Depp) याची फॅन्टास्टीक बिस्टमधून (Fantastic Beasts) हकालपट्टी करण्यात आली आहे. जॉनीची घटस्फोटीत पत्नी अॅक्वामॅन (Aquaman) फेम अॅम्बर हर्ड (Amber Heard) हिनं त्याच्या कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप केले होते. आता हे आरोप कोर्टात खरे ठरले आहेत. परिणामी वॉर्नर ब्रोसनं (Warner Bros) आपल्या आगामी प्रोजेक्टमधून जॉनी डेपला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. स्त्रियांवर अत्याचार (Divorced wife)करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला आम्ही काम देणार नाही, अशी भूमिका या निर्मिती संस्थेनं घेतली आहे.
यापूर्वीही जॉनीला डिज्नी स्टुडिओजनं (Disney Studios) पायरेट्स ऑफ द कॅरिबियन (Pirates of the Caribbean) या चित्रपट मालिकेतून बाहेर काढलं होतं. यानंतर आता फॅन्टास्टीक बिस्टमधून त्याला बाहेर काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर नाराज झालेले चाहते या फ्रँचाईजीवर बहिष्कार टाकण्याची मागणी करत आहेत.
जॉनीच्या जबरदस्त अभिनयामुळं पायरेट्स ऑफ द कॅरेबियन आणि फॅन्टास्टीक बिस्ट या फ्रँचायजी एवढ्या लोकप्रिय झाल्या. आता तोच नाही तर सिनेमा कोणासाठी पाहायचा अस प्रश्न चाहत्यांनी केला आहे. चाहत्यांकडून सिनेमावर बहिष्कार टाकला जाऊ नये, यासाठी पायरेट्सचे आगामी प्रोजेक्ट पुढं ढकलण्यात आले आहेत. जॉनी डेप हा एक सुपरस्टार अभिनेता आहे. जगभरातील कोट्यवधी लोक त्याला फॉलो करतात. चाहत्यांमध्ये त्याची चांगलीच क्रेजही आहे.
नेमकं प्रकरण काय ?
जॉनी डेप आणि अॅम्बर हर्ड यांनी 2016 साली विवाह थाटला होता. अॅम्बर जॉनची तिसरी पत्नी होती. परंतु काही अंतर्गत मतभेदांमुळं वर्षभरातच त्यांच्या संसारात फूट पडायला लागली. गेली 4 वर्षे झाली आहेत, दोघंही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अॅम्बरनं जॉनीवर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप करत 50 लाख अमेरिकन डॉलरचा दावा ठोकला होता. हा दावा सिद्ध करण्यात अॅम्बरला लंडन उच्च न्यायालयात (London High Court) यश आलं आहे.