बहुजननामा ऑनलाइन टीम – मोहरीच्या तेलामध्ये अतिशय औषधी गुणधर्म (Mustard Oil)असतात. हे तेल शरीराच्या बर्याच लहान-मोठ्या समस्यांवर मात करण्यासही मदत करू शकते.
मोहरीचे तेल हे कडू तेल म्हणून ओळखले जाते. मोहरीचे तेल स्वयंपाकात वापरले जाते. केवळ आरोग्यच नाही तर सौंदर्य वाढविण्यास मदत करते. हे तेल शरीराच्या अनेक लहान-मोठ्या समस्यांवर विजय मिळविण्यासही मदत करते. मोहरीच्या बियामधून तेल काढले जाते. मोहरीच्या साह्याने बर्याच आजारांमध्ये आराम मिळू शकेल. तेलाने आपले रूप सुधारू शकता. मोहरीच्या तेलाचे फायदे पाहू.
1. सुरकुत्या
मोहरीच्या तेलाने चेहर्यावरील सुरकुत्या दूर करू शकता. फक्त मोहरीच्या तेलाची मालिश करणे आवश्यक आहे. प्रथम चेहऱ्यात तेल मुरावा. नंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. त्याद्वारे सुरकुत्या कमी करण्यास मदत होते.
2 मुरूम
मुरमांवर उपाय म्हणून नारळ आणि मोहरीच्या तेलाने चेहऱ्यावर मालिश करावे आणि थोडावेळ सोडा. मग स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. हे चेहऱ्यावरील मुरूम कमी करण्यास मदत करू शकते.
3.मॉइश्चरायझर
मोहरीचे तेल एक नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. हिवाळ्यात त्वचेमध्ये बहुतेक वेळा डँड्रफ आणि ओठ फ़ुटतात. मोहरीचे तेल घेऊन त्वचेवर लावल्यास कोरडेपणापासून मुक्तता होते.
4. डार्क स्पॉट्स
मोहरीच्या तेलाने डार्क स्पॉट कमी करता येतात. हरभरा पीठ आणि दही मोहरीच्या तेलात मिसळून पेस्ट तयार करा आणि चेहऱ्यावर लावा. हे चेहऱ्यावरील डार्क स्पॉट कमी करण्यात, तसेच चेहरा चमकदार करण्यास मदत करू शकते.