मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – अभिनेता दिलीपकुमार यांचा भाऊ एहसान खान कोरोनामुळे वयाचा ९२ व्या वर्षी बुधवारी रात्री रात्री ११ वाजता निधन झाले. त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याचबरोबर १२ दिवसांपूर्वीच दिलीपकुमार यांचे दुसरे भाऊ अस्लम खान यांचाही करोना संसर्गामुळे लीलावती रुग्णालयात मृत्यू झाला होता.
लीलावती रुग्णालयात एहसान खान यांच्यावर डॉ. जलील परकार उपचार करत होते. अगोदरच अनेक आजार त्यांना होते. त्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावत गेली. त्यातच त्यांचे निधन झाले. एहसान हे दिलीपकुमार यांचे छोटे भाऊ होते.
एहसान खान यांना हृदयविकार, उच्च रक्तदाब आणि अल्झायमरचा त्रास होता. करोनामुळे जास्त त्रास होत राहिला अन् त्यात त्याचे निधन झाले, अशी रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. दुसरी धक्कादायक बाब अशी की, दिलीपकुमार यांचे दुसरे भाऊ अस्लम खान यांचाही करोनामुळेच मृत्यू झाला होता. २१ ऑगस्ट रोजी अस्लम खान यांचे निधन झाले. अस्लम हेसुद्धा लीलावती रुग्णालयातच उपचार घेत होते. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने तसेच ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सलग दोन अपघात कुटुंबावर कोसळल्यामुळे दिलीपकुमार यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
यापूर्वीही करोना संसर्गामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर एप्रिल महिन्यात दिलीपकुमार यांच्या तब्येतीबाबत अफवा पसरल्या होत्या. त्यावर तातडीने दिलीपकुमार यांच्यावतीने अधिकृत माहिती देऊन अफवांना पूर्णविराम देण्यात आला होता. दिलीपकुमार यांची प्रकृती उत्तम आहे.