बहुजननामा ऑनलाइन टीम – मुंबई : आज लागोपाठ दुसर्या दिवशी सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये वाढ केली आहे. या वाढीनंतर आता बहुतांश शहरात पेट्रोलचे भाव उच्चत्तम स्तरावर पोहचले आहेत. पेट्रोलचा भाव 25 पैसे प्रति लीटर तर डिझेलचा दर सुद्धा 25 पैसे प्रति लीटरने वाढला. या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोल 92.86 रुपये आणि डिझेल 83.30 रुपये प्रति लीटरच्या विक्रमी पातळीवर पोहचले आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. ज्यामुळे दोन्ही इंधनाचे भाव विक्रमी स्तरावर पोहचले आहेत.
या वर्षी 27 दिवसात 10 दिवस इंधनाचे दर वाढले आहेत, परंतु या दरम्यान पेट्रोलचा भाव 2.59 रुपये प्रति लीटरपर्यंत वाढला आहे. डिझेलच्या भावात सुद्धा 2.35 रुपये प्रति लीटर पर्यंत वाढ झाली आहे. अनेक शहरात हा आतापर्यंतचा उच्च स्तर आहे.
पुणे 92.74 – 81.92
ठाणे 92.38 – 81.52
औरंगाबाद 93.38 – 82.55
धुळे 93.27 – 82.45
कोल्हापूर 92.78 – 81.99
नाशिक 92.94 – 82.12
रायगड 92.50 – 81.67
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात एक्साइज ड्यूटी, डिलर कमीशन आणि अन्य गोष्टी मिळवल्यानंतर दर जवळपास दुप्पट होतात. जर केंद्र सरकारची एक्साइज ड्यूटी आणि राज्य सरकारांचा वॅट हटवला तर डिझेल आणि पेट्रोलचा रेट जवळपास 27 रुपये लीटर राहिल, परंतु केंद्र असो की राज्य सरकार, दोन्ही कोणत्याही स्थितीत टॅक्स कमी करत नाहीत. कारण महसूलाचा एक मोठा भाग येथून येतो.
एसएमएसने मिळेल तुमच्या शहरातील इंधन दराची माहिती
तुम्हाला तुमच्या शहरातील इंधनाचे दर जाणून घ्यायचे असल्यास त्यासाठी मोबाईल क्रमांक नोंदणीकृत करावा लागेल. या क्रमांकावर एसएमएसद्वारे तुम्हाला ही माहिती मिळू शकते. यासाठी एसएमएस पाठवण्यापूर्वी कोणत्याही पेट्रोल पंपावरून डीलर कोड घ्यावा लागेल. एसएमएस सुविधा मिळवण्यासाठी कोड आवश्यक आहे.
कंपनी आणि क्रमांकाची सुविधा
1 इंडियन ऑयल ग्राहक RSP<डीलर कोड 92249 9 2249
2 बीपीसीएल ग्राहक RSP<डीलर कोड 9223112222
3 एचपीसीएल ग्राहक HPPRICE<डीलर कोड 9222201122
वरील क्रमांकावर एसएमएस पाठवून तुम्ही तुमच्या शहरातील इंधनाचे दर जाणून घेवू शकता