बहुजननामा ऑनलाइन टीम – नागपूर : घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये काही दिवसापासून वाढ झाली आहे. दरम्यान सरकारकडून प्रत्येक सिलिंडरमागे अनुदान दिले जात होत्ते मात्र, आता हे अनुदान हळूहळू बंद होत चाले असल्याचे समोर आले आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक झालं सोसावी लागत आहे. विशेष म्हणजे सरकारने टप्याटप्याने या अनुदानात कपात करत ते पूर्णपणे बंद करण्यापर्यंत आणले असून नागरिकांना याबाबत अद्यापही माहिती नाही.
एप्रिल २०२० ला एका घरगुती गॅस सिलिंडरसाठी ७८९.५० रुपये दिल्यानंतर ग्राहकांच्या बँक खात्यात अनुदान म्हणून १९९.१० रुपये जमा होत होते. जानेवारी २०२१ मध्ये एका सिलिंडरसाठी ७४६ रुपये द्यावे लागत आहेत. परंतु बँक खात्यात मात्र केवळ ४० रुपये १० पैसे जमा होत आहेत. साधारणपणे एका ग्राहकाला एका वर्षात अनुदानाच्या १२ सिलिंडरची तरतूद आहे. परंतु अनेक लोक वर्षभरात केवळ सात ते आठ सिलेंडरचाच वापर करतात. उर्वरित चार ते पाच सिलिंडरचा काळाबाजार होतो. दरम्यान, उज्ज्वला योजनेंतर्गत गरिबांना मोफत गॅस कनेक्शन देण्यात आल्याने नागपुरमध्ये एप्रिल २०२० ते ऑगस्ट २०२० पर्यंत घरगुती गॅस सिलिंडरच्या मागणीत दहा टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली असल्याचे सांगितले जाते.
कसे ठरते अनुदान
घरगुती गॅस सिलिंडरचे अनुदान आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या किमतीवर अवलंबून असते. कधी १०० रुपये तर कधी पाच रुपयांचे अनुदान दिले जाते. पूर्वी ६१२ रुपयांपेक्षा अधिक किमतीवर ग्राहकांना अधिक अनुदान मिळत होते. परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर किमती वाढल्याने अनुदान कमी झाले.