धुळे : बहुजननामा ऑनलाईन – घरात पती आणि मुले नसताना 32 वर्षीय विवाहित महिला शीतल भिकन पाटील यांचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना (Dhule Crime) घडली आहे. धुळे शहरातील जगन्नाथनगर येथे राहत्या घरात हा थरार घडला. यामुळे परिसरात एकच खळबळ (Dhule Crime) उडाली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळला संशयीत
महिलेचा पती घरात नसताना संशयिताने महिलेवर धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. मित्राने हे कृत्य केल असावे; असा संशय महिलेच्या पतीने व्यक्त केला आहे. घटनेनंतर महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संशय व्यक्त करण्यात आलेला इसम घरी येऊन गेल्याचे दिसत आहे. मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून पश्चिम देवपूर पोलीस तपास करत आहेत. महिलेचा खून कोणी व का केला? हे अजून उघड झाले नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.
Web Title :- dhule crime | house wife women muder when husband and son out side of home
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Konkan Railway Recruitment 2021 | कोकण रेल्वेत सिव्हिल इंजिनीअर्ससाठी मोठी भरती; आजच करा अर्ज