पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | सामाजिक सुरक्षा विभागासह अमली पदार्थ विरोधी पथकाने कोंढवा परिसरात (Kondhwa) हॉटेल क्लब 24 दोराबजीमध्ये (Hotel Club 24 dorabjee) सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर छापा टाकला. या कारवाईत 4 चिलीम आणि इतर साहित्य असा 36 हजार रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. याप्रकरणी हॉटेल मालक आणि व्यवस्थापकविरूद्ध गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती की, महमदवाडीतील हॉटेल क्लब 24 दोराबजीमध्ये (Hotel Club 24 dorabjee) अवैध हुक्काबार सुरू आहे. या माहितीनुसार, पथकाने सापळा रचून छापा टाकला असता हॉटेल मालक अमर खंडेराव (रा. महमदवाडी) आणि मॅनेजर विक्रम सुखदेव जाधव ( वय 30) हे हुक्काबार चालवत असल्याचे आढळले.
याप्रकरणी हुक्काबार मालक आणि मॅनेजरविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (pune police commissioner amitabh gupta), पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे (deputy commissioner of police shriniwas ghadge) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
Web Title :- pune crime branch police raid on hookah bar in kondhwa area, manager and owner booked
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Dhule Crime | धक्कादायक ! पती आणि मुले बाहेर असताना पत्नीचा धारदार शस्त्राने खून, प्रचंड खळबळ
Maharashtra Police News | दुर्दैवी ! जेवताना श्वसन नलिकेत अन्न अडकल्याने पोलिस कर्मचार्याचा मृत्यू