मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) चित्रपटावरुन राज्यातील राजकीय आखाडा तापला आहे. या वादावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जर कुणाला त्याबद्दल आक्षेप असतील तर त्यांनी सनदशीर मार्गाने मांडावेत. पण अशा पद्धतीने कुणी थिएटरमध्ये घुसून लोकांना मारत असतील तर ते सहन केले जाणार नाही. अशांवर कारवाई (Action) केली जाईल, अशा शब्दात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादी आणि संभाजी ब्रिगेडच्या (Sambhaji Brigade) कार्यकर्त्यांना इशारा दिला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad) आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी काल ठाण्यातील विवियान मॉलमधील (Vivian Mall) सुरु असलेला ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद पाडला. यावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना NCP आणि संभाजी ब्रिगेडला दिला इशारा दिला.
LIVE | Media interaction in #Mumbai https://t.co/aD0a3mZv7S
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 8, 2022
हर हर महादेव सिनेमावरुन राज्यात राडा सुरु आहे. ठिकठिकाणी सिनेमे बंद पाडले जात आहेत. ठाण्यात मनसेच्या (MNS) कार्यकर्त्याला मारहाण झाल्याची घटना घडली. यावर प्रतिक्रिया देत असताना फडणवीस यांनी कायदा (Law) हातात घेऊ नका, असा इशारा दिला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
ते पुढे म्हणाले, हा सिनेमा मी पाहिला नाही. त्यात काय वाद आहे, मला माहित नाही.
कुणाला जर त्याबद्दल आक्षेप असतील तर त्यांनी सनदशीर पद्धतीने मांडावे.
पण कुणी थिएटरमध्ये घुसून लोकांना मारत असेल तर ते सहन केले जाणार नाही.
अशांवर कारवाई केली जाईल, असा इशारा फडणवीसांनी दिला.
मत स्वातंत्र्य सगळ्यांना आहे. काही आक्षेप असेल तर बोला. पण कायदा सुव्यवस्था (Law and Order)
कोणीही हातात घेवू नये. जे कायदा सुव्यवस्था हाती घेतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल,
असेही देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं.
Web Title :- Devendra Fadnavis | har har mahadev movie devendra fadnavis warning on the movie controversy
हे देखील वाचा :
Rishabh Pant | स्टेडियम मध्ये टवाळ प्रेक्षकांनी ऋषभ पंतला उर्वशीच्या नावाने डिवचलं अन्…
Rishabh Pant | स्टेडियम मध्ये टवाळ प्रेक्षकांनी ऋषभ पंतला उर्वशीच्या नावाने डिवचलं अन्…
Kartik Aaryan | कार्तिक आर्यन करतोय ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याच्या बहिणीला डेट; पहा आहे तरी कोण ?