बहुजननामा ऑनलाईन टीम : ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) चित्रपट म्हटलं की पहिल्यांदा डोळ्यासमोर विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) हे नाव. हा चित्रपट प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात उचलून धरला होता. तर या चित्रपटावर वाद देखील झाले होते चित्रपटावर टीका झाल्याचा एकंदरीत अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांना फायदा झाला. या प्रोजेक्ट नंतर अशा पद्धतीच्या घटनांवर चित्रपट काढण्याचे प्रेक्षकांकडून सुचवण्यात आले होते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
So many meetings yet not a final title of the film. #NewBattle pic.twitter.com/5suVcfTPYv
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) November 7, 2022
मध्यंतरी अग्निहोत्री यांनी त्यांच्या नव्या प्रोजेक्ट बद्दल खुलासा केला होता. एवढेच नाही तर त्यांनी बोलताना म्हणाले, “आता माझ्या हाती एक नवीन कथा लागली आहे. जी मी इथे राहून सादर करू शकतो. मी स्वतः युपी कानपूरचा असून देखील इथे असे चित्रपट करणे माझ्यासाठी शक्य नव्हते. एवढेच नाही तर अग्निहोत्री हे यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांच्याशी भेट घेतली होती. यंदाचा प्रोजेक्ट हा तिथेच होत असल्याने इथल्या हिंदी भाषिक लोकांनाही या क्षेत्रात काम करण्याची मोठी संधी उपलब्ध करून देण्याचे यावेळी अग्निहोत्री यांनी सांगितले. चित्रपटाच्या माध्यमातून कोविडच्या काळात covaxin ही लस कशी तयार करण्यात आली त्याची संपूर्ण कथा अग्निहोत्री (Vivek Agnihotri) या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडणार आहेत.
त्या काळात कशाप्रकारे लोकांनी एवढे लस कसे तयार केले आहेत याची गोष्ट सामान्य माणसांना माहीत नाही
ती गोष्ट लोकांसमोर घेऊन येण्याचा उद्देश अग्निहोत्री यांचा आहे.
10 डिसेंबर पासून 45 दिवस अग्निहोत्री या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात येणार आहे.
स्थानिक लोकांना देखील त्यामध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
या चित्रपटात नाना पाटेकर (Nana Patekar), पल्लवी जोशी (Pallavi Joshi), निवेदिता भट्टाचार्य (Nivedita Bhattacharya)
हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटातून 90% स्थानिक नागरिकांना काम देण्याच्या आश्वासन हे अग्निहोत्री यांनी दिले.
या चित्रपटाच्या चित्रीकरणानंतर ‘दिल्ली फाईल’वर अजून रिसर्च करून याचे चित्रीकरण केले जाईल असे अग्निहोत्री यांनी स्पष्ट केले.
Web Title :- Vivek Agnihotri | the kashmir files director vivek agnihotri is set to shoot a film with nana patekar in lucknow
हे देखील वाचा :
Kartik Aaryan | कार्तिक आर्यन करतोय ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याच्या बहिणीला डेट; पहा आहे तरी कोण ?
Bank Interest Rate Hike | HDFC पाठोपाठ ‘या’ बँकेनेही वाढवले व्याजदर, नवे व्याजदर लागू: EMI ही वाढणार