मुंबई : बहुजननामा ऑनलाईन- राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Agriculture Minister Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांच्यावर टीका करताना वादग्रस्त विधान केले आहे. त्याचे राज्यभर तीव्र पडसाद उमटत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याचं कुठलंही समर्थन करणार नाही, असं स्पष्ट केलं आहे. मात्र दोन्ही बाजूंनी अचारसंहिता पाळणं गरजेचं आहे, असं मतही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केलं.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
कोणीही महिलांबद्दल अपशब्द काढू नयेत, ते अतिशय चुकीचं आहे. ते जसं आमच्याकडच्या नेत्यांना लागू आहे, तसं त्यांच्याकडील नेत्यांनाही लागू आहे. मला त्यामध्ये जायचं नाही. मात्र राजकारणात (Politics) आचारसंहिता (Code of Conduct) पाळली गेली पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.
LIVE | Media interaction in #Mumbai https://t.co/aD0a3mZv7S
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 8, 2022
अब्दुल सत्तार जे बोलले, त्याचं कुठलंही समर्थन मी करणार नाही. ते चूकच आहे, पण त्याच वेळी खोके वगैरे उलट सुलट बोलणंही चूकच आहे, हेही समजून घेतलं पाहिजे. दोन्ही बाजूंनी आचारसंहिता पाळणं गरजेचं आहे. राजकारणाची पातळी अतिशय खाली चालली आहे. महाराष्ट्रात ही पातळी असू नये असं मला वाटतं. जोपर्यंत मोठे नेते आपापल्या नेत्यांना सांगत नाहीत तोपर्यंत हे शक्य होणार नाही, असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
काय म्हणाले अब्दुल सत्तार?
औरंगाबादमध्ये एका मराठी वृत्तवाहीनीच्या प्रतिनिधीशी बोलताना सत्तार यांना सुप्रिया सुळेंबद्दल प्रश्न
विचारण्यात आला. तुम्ही सुप्रिया सुळेंना खोके देण्याची ऑफर केल्यावरुन त्यांनी तुमच्याकडे आले असतील
खोके म्हणून तुम्ही खोके देण्यासाठी तयार झाला आहात, असं म्हटलं आहे.
यावर काय सांगाल असं सत्तार यांना विचारण्यात आले.
या प्रश्नावर सत्तार यांनी सुप्रिया सुळेंचा एकरी उल्लेख करत त्यांना शिवी दिली.
‘इतकी भिकारXX झाली असेल सुप्रिया सुळे तर तिलाही देऊ’ असं उत्तर सत्तार यांनी दिलं.
Web Title :- Devendra Fadnavis | dcm devendra fadnavis reacts on abdul sattar controversial statement on supriya sule
हे देखील वाचा :
Katrina Kaif | कतरिना कैफने तिच्या लग्नामध्ये झालेल्या भांडणाबाबत केला मोठा खुलासा; म्हणाली…