बहुजननामा ऑनलाइन टीम – जगभरात कोरोनाचा हाहाकार सुरु असून ब्रिटनपाठोपाठ आणखीन एका मोठ्या राजघराण्यातील सदस्यांना कोरोना विषाणूच्या संसर्ग झाल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. सौदी अरेबियाच्या राजघराण्यातील 150 सदस्यांवर करोनाचा संसर्ग झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सौदीचे राजे मोहम्मद बिन सलमान करोनापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी विलगीकरणामध्ये गेले आहेत.
सौदी अरेबियातील राजघराण्यातील 150 जणांना करोनाचा संसर्ग झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. सौदीचे राजे फैसल बिन अब्दुल अजीज अल सऊद यांना अतीदक्षता विभागात दाखल करण्यात आला आहे. 70 वर्षांचे फैसल हे रियाद प्रदेशाचे राज्यपाल आहेत. शाही कुटुंबातील सदस्य वरचेवर युरोपीय देशांचे दौरे करत असतात. याच यात्रेदरम्यान राजघराण्यापर्यंत करोनाचा संसर्ग पोहचल्याचे सांगितले जात आहे. किंग फैसल यांच्यावर शाही कुटुंबाचे डॉक्टर उपचार करत आहेत.
किंग फैसल स्पेशलिस्ट रुग्णालयामध्ये 500 अतिरिक्त बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. देशामध्ये कोरोनाचा धोका वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण देशातून येणार्या व्हिआयपी रुग्णांसाठी खास व्यवस्था तयार केली जात आहे. राजघराण्यातील व्यक्तींवर उपचार करता कोणतीही अडचण येणार नाही तसेच खोल्या कमी पडणार नाहीत याची आम्ही काळजी घेत असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.