बीड न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – कोरोनाची दुसरी लाट (Corona second wave) ओसरत असताना कोरोना विषाणूने वातावरणाशी जुळवून घेऊन डेल्टा प्लस (Delta Plus Variant) या नव्या रूपात पुन्हा एकदा डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. डेल्टा प्लस (Delta Plus Variant) या व्हेरिएंट राज्यात आतापर्यंत 45 रुग्ण आढळले आहेत. राज्यात केलेल्या तपासणीतून 80 टक्क्यांहून अधिक नमुन्यांमध्ये डेल्टा व्हेरिएंट (Delta variant) आढळला आहे. औरंगाबाद (Aurangabad) पाठोपाठ बीड (Beed) मध्येही डेल्टा व्हेरिएंटचा शिरकाव झाला असून एक रुग्ण आढळून आला आहे. या घटनेमुळे प्रशासन अलर्ट झाले असून बीड जिल्ह्यातल्या चार तालुक्यात कडक निर्बंध (Strict restrictions remain) कायम ठेवण्यात आले आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान 200 हुन अधिक कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत.
त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. जनुकीय कर्मनिर्धारण सर्वेक्षणातून हा रुग्ण शोधला असल्याचं समोर आले आहे.
याशिवाय या रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याचे कामही युद्ध पातळीवर सुरु आहे.
राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिलेल्या माहितीनुसार डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण नाशिकपाठोपाठ मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि औरंगाबादेत आढळून आले आहेत.
या व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या 45 वर पोहोचली आहे. राज्यात डेल्टा आणि डेल्टा प्लसच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे.
परंतु नागरिकांनी घाबरून जाण्याचे काही एक कारण नाही.
जिथे रुग्ण वाढतात तिथे खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे सांगत आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचेही टोपे यांनी सांगितले.
Web Title : Delta Plus Variant | corona virus delta plus variant in beed district one patient found
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
LIC Jeevan Akshay | LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये गुंतवणूक करून आयुष्यभर मिळतात पैसे, जाणून घ्या अटी
Maruti Alto वर मिळत आहे 25 हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट! जाणून घ्या पूर्ण डिटेल