नवी दिल्ली : सिंधु बॉर्डरवर शेतकर्यांची भेट घेतल्यानंतर दिल्ली पोलिसांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना घरात नजर कैदेत ठेवले आहे. त्यांचे आजच्या सर्व बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत असलेल्या शेतकर्यांची केवळ भेट घेतली म्हणून एका मुख्यमंत्र्याला घरात नजरकैदेत टाकण्याच्या या कारवाईचे वर्णन आप ने अभुतपूर्व असे केले आहे.
दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घराबाहेर पोलिसांचा पहारा ठेवला असून कोणालाही घरात जाऊ दिले जात नाही अथवा घरातून बाहेर पडू दिले जात नाही.
भारत बंदच्या आंदोलनाचे फोटो टाकणे, आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिल्ली पोलिसांनी दिला असल्याचा दावा आप ने केला आहे.
अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी सिंधु बॉर्डरवर जाऊन आंदोलक शेतकर्यांयांची भेट घेतली. आपण कोणत्याही पक्षाचा म्हणून नाही तर, एक सेवादार म्हणून भेट घेण्यासाठी आलो, असे त्यांनी शेतकर्यांना सांगितले. त्यानंतर ते घरी परतल्यावर पोलिसांनी त्यांच्या घराच्या सर्व बाजूला बॅरिकेट लावून रस्ते बंद केले आहे. त्यांना जणू घरातच नजरकैदेत ठेवल्यासारखी ही परिस्थिती असल्याचे आप चे सौरभ भारद्वाज यांनी सांगितले.