नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले असताना मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली आहे. ८ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून ११ फेब्रुवारीला यांचे निकाल लागणार आहेत. निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद चालू असताना आयोगाने दिल्लीतील निवडणुकांची तयारी पूर्ण झाली आहे. त्यात ९० हजार कर्मचाऱ्यांची गरज पडणार आहे. दिल्ली विधानसभेच्या सर्व ७० जागांसाठी निवडणूका होणार असून दिल्लीत एकूण १. ४६ कोटी मतदार आहेत. वयोवृद्ध मतदार टपाल मतपत्रिकेद्वारे मतदानात सहभागी होऊ शकतात. राज्यात २,६८९ ठिकाणी मतदान होणार असल्याचे सांगितले.
७० सदस्यसंख्या असलेल्या या निवडणुकांचा कार्यकाळ २२ फेब्रुवारी रोजी संपेल. निवडणूक होण्यापूर्वी नियमांनुसार नवीन विधानसभा स्थापन करावी लागेल. अशातच आज निवडणूक आयोग विधानसभा निवडणुकीसाठी अधिसूचना देईल. त्यांनतर आचारसंहिता लागू होईल.
दिल्ली विधानससभेत आपचे ६२ आमदार आणि भाजपचे ४ आमदार आहेत. बाकी सर्व जागा इतर पक्ष आणि अपक्षांकडे असून अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री आणि मनीष सिसोदिया हे उपमुख्यमंत्री आहेत.