मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – विधानसभेत ज्यांच्या हातून संधी गेली असे नेते आता विधान परिषदेची वाट बघत असून अनेक जण आश्वासनांवर तर अनेक जण आपल्या पायावर विधान परिषदेत जाण्याची मागणी आपआपल्या पक्षाकडे करत आहेत. राष्ट्रवादीचे साताऱ्याचे नेते शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांच्यात विधान परिषदेच्या मोकळ्या झालेल्या पहिल्या जागेसाठी चांगलीच चुरस लागली आहे.
विधान पारेषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे विधानसभेत विजयी झाल्यामुळे विधानन परिषदेची जागा रिकामी असून ही जागा राष्ट्रवादीकडेच असून या जागेवर कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी हे दोन्ही नेते राष्ट्रवादीसाठी महत्वाचे मानले जातात.
परंतु अजित पवार यांनी विधान परिषदेची जागा अमोल मिटकरी यांना देणार असल्याची घोषणा केली हाती. उपमुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्यामुळे मिटकरी यांच्या आशा वाढल्या असताना त्या जागेसाठी शरद पवार यांचे विश्वासू मानले जाणारे शिंदे यांचाही विचार चालू होता. साताऱ्यातील दोन्ही राजे भाजपमध्ये गेले असताना शिंदे यांनी एकट्याने विजयासाठी लढले होते. पण त्यांना पराभव पत्करावा लागला. शिंदे हे पवार यांच्या विश्वासातले मानले जातात. अजित पवार यांनी पराभूत झालेल्यांना विधान परिषद मिळणार नाही, असे स्पष्ट केले होते. पण शिंदे हे शरद पवार यांच्या विश्वासातले असल्यामुळे ते त्याला अपवाद ठरू शकतात.