मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – कंट्रोवर्सी क्वीन राखी सावंतच्या लग्नाची बातमी ऐकून सर्वजण खुश आहेत. परंतु, एक व्यक्ती आहे जो ही गोष्ट ऐकून नाराज झाला आहे. दीपक कलाल हा व्यक्ती ही बातमी ऐकून खुप नाराज आहे. साल २०१८ मध्ये त्याने राखीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. राखी सावंतच्या लग्नाची बातमी ऐकून दीपक कलालने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेयर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये तो राखी सावंतने लपून-छपून लग्न केल्याबद्दल खरी खोटी सुनावत आहे.
या व्हिडिओत तो राखी सावंतला धमकी देतांना दिसतो आहे. या व्हिडीओमध्ये दीपक कलाल म्हणतो की, “राखी सावंत ये मंगलसूत्र देख रही है ना. यही वो मंगलसूत्र है, जो पूरे मीडिया के सामने तू मेरे गले में फांसी थी और अभी जो ये तूने छुपके से शादी की है ना. पहले क्या बोली थी मीडिया को कि दीपक कलाल के साथ शादी करूंगी.”
त्याचबरोबर त्याने तिच्यावर पैसे लुटल्याचे आरोप देखील केले आहेत. त्यावर तो म्हंटला की, “पूरे 4 करोड़ रुपये दिए मैंने तुझे पूरे चार करोड़. वो भी ऐसे गिन-गिन के दिए हैं बोरी भर-भर के. लेकिन क्या किया तूने ? खा गई, निगल गई. दीपक कलाल का पैसा खा गई. राखी अगर तूने चार दिन के अंदर मेरे पैसे नहीं लौटाए, तो लाइफ खराब कर दूंगा.” दरम्यान, दिपकच्या या व्हिडीओला राखी सावंतने देखील शेयर केले आहे. त्यानंतर आता राखी सावंतचे चाहते त्याच्यावर तुटून पडले असून त्याला मोठया प्रमाणात ट्रोल केले जाते आहे.