मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – अवैध व्यवसाय चालविणाऱ्यांची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी एका महिलेस आणि तीन पीडित मुलींना रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. कांदिवली पश्चिमेकडील सेक्टर – २ मधील प्लॉट क्रमांक ५ मध्ये काल पोलिसांनी धाड टाकून राहत्या घरातील वेश्याव्यवसायचे रॅकेट उध्वस्त केले आहे.
याप्रकरणी चारकोप पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ३७० (३), ३, ४, ५ आणि अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा १९५६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. महिला रोज मोबाईल फोनवरून मुलींचे फोटो व्हाट्स ऍपद्वारे आपल्या संपर्कात असलेल्या लोकांना शेयर करत असे. त्यानंतर ते लोक महिलेच्या घरी जाऊन मुलगी पसंत करत आणि महिलेच्या राहत्या घराच्या बेडरूममध्ये ग्राहकांना पाठवून वेश्याव्यवसाय चालवीत असे. हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी राहणाऱ्या महिलेस व तीन पीडित मुलींना पोलिसांनी ताब्यात घेऊन तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.