नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरत असाल तर ही बातमी तुम्ही जाणून घेणे खुप जरूरी आहे. कारण, ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत जर तुम्ही जने डेबिट-क्रेडिट कार्ड बदलून घेतले नाही तर ते बंद होणार आहे.
मॅग्नेटिक स्ट्रीपचे कार्ड बँका बंद करत आहेत. देशात सध्या मॅग्नेटिक आणि चीप असलेले कार्डस अस्तित्वात आहेत. परंतु, आता मॅग्नेटिक स्ट्रीप असलेले कार्ड बँकांनी बंद केले आहे. आरबीआयच्या आदेशानुसार कार्ड बदली करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०१९ आहे. ग्राहकांची डेबिट आणि क्रेडिट कार्ड सुरक्षित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
मॅग्नेटिक स्ट्रीप आता जुने तंत्रज्ञान झाले असल्याने बँक अशी कार्ड बंद करत आहे. त्याऐवजी आता चीप असलेले कार्ड तयार केले जात आहे. सर्व जुनी कार्ड अशापद्धतीने बदलली जात आहेत.
Visit : bahujannama.com