नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या उन्नाव बलात्कार प्रकरणी भाजप आमदार कुलदीप सेंगला न्यायालयाने दोषी ठरतवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच 25 लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेश दिला आहे. दिल्लीतील तीस हजारी कोर्टात आज न्यायालयाने आपला निकाल सुनावला. या प्रकरणातील सहआरोपी शशी सिंह याची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली. कोर्टाने दोषी आमदार सेंगरचे मोबाईल लोकेशनला महत्त्वाचा पुरावा मानला. पीडित युवतीला शशी सिंह आमदार कुलदीप कडे घेऊन गेला होता.
संपूर्ण देशभरात गाजलेल्या उन्नाव बलात्कार प्रकरणात कुलदीप सिंह सेंगरला न्यायालयाने 16 डिसेंबर रोजी दोषी ठरवलं होतं. यावेळी 19 डिसेंबरला शिक्षेवर सुनावणी करणार असल्याच जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार न्यायालयाने कुलदीप सिंह सेंगरला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. उन्नव येथे 2017 मध्ये एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केले होता.
2017 Unnao rape case: Delhi's Tis Hazari Court has also ordered BJP expelled MLA Kuldeep Singh Sengar to pay a compensation of Rs. 25 lakhs to the victim https://t.co/xfaVVsOG0X
— ANI (@ANI) December 20, 2019
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हा खटला लखनऊ येथील न्यायालयातून दिल्ली न्यायालयात वर्ग करण्यात आला होता. 5 ऑगस्टपासून या खटल्याची दैनंदिन सुनावणी झाली. या प्रकरणी सेंगर व सहआरोपी शशी सिंग यांच्याविरोधात गुन्हेगारी कट रचणे, अपहरण, बलात्कार आदींशी संबंधित कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले होते.
उत्तर प्रदेशातील बांगरमऊ विधानसभा मतदारसंघातून सेंगर चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आला. सेंगरने 2017 मध्ये एका युवतीचे अपहरण केल्यानंतर कुलदीप सेंगरने पीडितेवर बलात्कार केला होता. या घटनेवेळी पीडित युवती अल्पवयीन होती. बलात्कारेच प्रकरण उघडकीस आल्यानंतर भाजपने सेंगरला पक्षातून निलंबित केले. ऑगस्टमध्ये सेंगर आणि सहआरोपी शशी सिंह विरोधात गुन्हेगारी कट, अपहरण, बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत आरोप नश्चित करण्यात आले होते.