नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांचा दावा आहे की, 9 सप्टेंबर रोजी एमसीडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि दिल्ली पोलिसांच्या अधिकाऱ्यांना बोलावलं होतं. ज्यांनी आयोगाला दिल्लीत चालवल्या जाणाऱ्या स्पा सेंटरची सूचना दिली होती आणि त्यांनी हे स्विकारही केलं होतं की, मुलांची मसाज मुलींकडून करून घेतली जाऊ नये. स्पामधील सेक्स रॅकेटच्या कारवाईला घेऊन एमसीडीवर कठोर भूमिका घेत मालीवाल यांनी दिल्ली भाजपवर अनेक आरोप लावत सवालही उपस्थित केले आहे.
स्वाती मालीवाल म्हणाल्या, “जो नेता स्पाच्या कारवाईने वैतागला आहे त्याच नाव जाहीर करा. बीजेपी दिल्लीच्या नेत्यांचे किती स्पा सेंटर सुरु आहेत ? टुरिजम स्पाशी काय घेणंदेणं आहे. बीजेपीला दिल्लीचं बँकॉक बनवायचं आहे का ? आक्रमक होत स्वाती मालीवाल म्हणाल्या, “कोणत्या स्पाच्या मालकाचा फोन बीजेपी नेत्याला आला ? काय लिंक आहे त्यांच्यात ? आम्ही मागील काही दिवसांमध्ये अनेक स्पा सेंटरचं निरीक्षण केलं आहे. आम्ही अनेक ठिकाणी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. अनेक स्पा तर परवान्याशिवायच सुरु आहेत. दिल्ली पोलीस आणि एमसीडीच्या संगनमताशिवाय हे स्पा सेंटर चालू शकत नाहीत.”
मालीवाल पुढे म्हणाल्या, “दक्षिणी दिल्ली नगर निगममध्ये स्पा सेंटरसाठी अॅडवायजरी जारी करण्यासाठी सांगण्यात आलं आहे परंतु आता दिल्ली बीजेपीच्या नेत्यांच्या हस्तक्षेपानंतर त्यांनी तेही परत घेतलं आहे. दिल्ली बीजेपीमध्ये असे कोणते नेते आहे ज्यांना या स्पा सेंटरवर कारवाई नको आहे ? स्पा सेंटर चालवण्यात राजकीय लोकांच्या भूमिकेचाही तपास व्हायला हवा.” असं त्या म्हणाल्या.
दिल्ली महिला आयोगाच्या आरोपांनंतर साऊथ एमसीडीचे माजी महापौर कमलजीत सहरावत यांनी पलटवार करत म्हटलं की, “कोणताही अॅडवायजरी परत घेण्यात आलेला नाही आणि ना ही कोणत्या बीजेपी नेत्याचा फोन आला आहे. स्वाती मालीवाल हाइप क्रिएट करत आहेत.” दक्षिण एमसीडीनुसार 65 स्पा केंद्रांवर कारवाई करण्यात आली आहे. दक्षिण एमसीडीचे म्हणणे आहे की एमसीडीच्या नोंदणीकृत स्पा आणि मसाज केंद्रांवरही क्रॉस जेंडर मसाजवर बंदी कायम राहिल. स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेट प्रकरणी दिल्लीत चार एफआयआर नोंदविण्यात आले असून बर्याच मुलींची सुटका करण्यात आली आहे. या स्पा सेंटरमध्ये मोठ्या संख्येने कंडोम आणि अश्लील साहित्य जप्त करण्यात आले.
Visit : bahujannama.com