फिरोजाबाद : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमधील फिरोजाबाद जिल्ह्यातील एका खासगी शाळेच्या मुख्याध्यापक व सहकारी शिक्षकाने केजीच्या शिक्षिकेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. अल्पवयीन शिक्षिका २१ आठवड्यांची गरोदर राहिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. कुटूंबाच्या सांगण्यावरून पोलिसांनी आरोपींवर पोक्सो अॅक्ट, सामूहिक बलात्कार आणि आयपीसीच्या इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
पीडितेच्या कुटूंबाच्या म्हणण्यानुसार, १६ वर्षांच्या पीडित मुलीने एक वर्षापूर्वी मुस्तफाबाद येथील खासगी प्राथमिक शाळेत केजी शिक्षक म्हणून काम केले होते. मे महिन्यात शाळेच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकाने तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. घटनेनंतर आरोपींनी तिला जिवे मारण्याची धमकीही दिली. धमकीच्या भीतीने पीडितेने कोणालाही काहीही सांगितले नाही.
पीडितेच्या भावाने सांगितले की, घटनेच्या दिवशी दोन्ही आरोपींनी टिचिंग ट्रेनिंगच्या नावाखाली त्याच्या बहिणीला जबरदस्तीने शाळेत रोखले. यानंतर जेव्हा शाळेतील इतर शिक्षक व कर्मचारी निघून गेले, तेव्हा तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. २१ आठवड्यांपर्यंत पीडितेने कोणालाही काहीही सांगितले नाही कारण तिला सतत धमकावले जात होते. एफआयआर झाल्यानंतरही आरोपी तिला धमकावत होते.
शिकोहाबाद पोलिस स्टेशनचे एसएचओ अजय किशोर यांनी सांगितले की, फरार आरोपींचा शोध सुरु आहे. मुलीच्या वैद्यकीय अहवालाद्वारे गर्भधारणेची पुष्टी झाली आहे. पीडितेचे म्हणणे नोंदवून पुढील कारवाई केली जात आहे. दरम्यान पीडित मुलीच्या वडिलांना सतत दारू पिण्याची सवय होती. यामुळे, काही वर्षांपूर्वी त्याचा मृत्यू झाला. यानंतर आई शिवणकाम करून आपल्या मुलांची काळजी घेत असे. पीडितेने कुटुंब चालविण्यास मदत करण्यासाठी शाळेत काम करत होती.