बहुजननामा ऑनलाईन – डेटा पॅकपासून डीटीएच योजनांपर्यंत भारतीय बाजारपेठेत सध्या स्पर्धा चालू आहे. ज्यामध्ये सर्व कंपन्यांनी युजर्ससाठी कमी किंमतीचे डीटीएच पॅक ऑफर केले आहेत. त्याच वेळी, बरेच लोक दीर्घकालीन योजनांना प्राधान्य देतात, कारण त्यांना योग्य किंमतीत अधिक सुविधा मिळवता येते. तसेच त्यांना दरमहा टीव्ही कनेक्शनचे रिचार्जही करावे लागत नाही. तर दुसरीकडे डीटीएच कंपन्यांनाही यामध्ये बराच फायदा होतो. तसेच, टीव्ही चॅनेल कंपन्या अधिकाधिक लोकांना त्यांच्याशी जोडण्याचा प्रयत्न करीत आहेत. भारतीय दिग्गज डीटीएच कंपनी टाटा स्काय दीर्घकालीन योजनांच्या माध्यमातून अधिकाधिक ग्राहकांना फायदा करीत आहे. आता कंपनी या योजनेअंतर्गत संपूर्ण १२० दिवस ग्राहकांना आपली सेवा विनामूल्य प्रदान करणार आहे.
Tata Skyचे ऑफर
दीर्घकालीन ग्राहकांना याचा खूप फायदा होणार आहे. कारण आता कंपनी त्यांना १२ महिन्यांच्या रिचार्जवर कॅशबॅक देणार आहे . टाटा स्कायचे हे कॅशबॅक एका महिन्याच्या रिचार्ज एवढे असेल. याचा अर्थ असा की आता वापरकर्त्यांना १२ महिन्यांच्या रिचार्जवर एक महिन्याची विनामूल्य सदस्यता मिळेल. पूर्वी ग्राहकांना १२ महिने पूर्ण झाल्यानंतरच कॅशबॅक मिळत असे. पण आता टाटा स्काई रिचार्जच्या २ दिवसात कॅशबॅक देणार आहे. टाटा स्काईच्या या निर्णयामुळे देशातील अन्य डीटीएच कंपन्यांना आव्हान मिळणार आहे.
दीर्घकालीन योजनेचे फायदे
अलीकडे डीटीएच कंपन्या आपल्या ग्राहकांना दीर्घ मुदतीच्या योजनांमध्ये बरेच फायदे देतात. त्याचबरोबर डीटीएच ग्राहकांना तीन महिन्यांच्या रिचार्जवर ७ दिवस, ६ महिन्यांच्या रिचार्जवर १५दिवस आणि १२ महिन्यांच्या रिचार्जवर ३० दिवस नि: शुल्क सेवा देतात . जर ग्राहक २२ महिन्यांसाठी रिचार्ज करीत असेल तर त्यांना ६० दिवसांचे विनामूल्य सदस्यता मिळते. तसेच त्यांना ३३ महिन्यांच्या रिचार्जवर ९० दिवसांची सदस्यता आणि ४४ महिन्यांच्या रिचार्जवर १२० दिवसांची सदस्यता मिळते.
डिश टीव्हीचे ऑफर
डिश टीव्ही देखील आपल्या ग्राहकांना दीर्घ मुदतीच्या योजनांमध्ये बरेच फायदे देतात. डिश टीव्ही ग्राहकांना ३ महिन्यांच्या रिचार्जवर ७ दिवस, ६ महिन्यांच्या रिचार्जवर १५ दिवस आणि एका वर्षाच्या रिचार्जवर ३० दिवसांचे विनामूल्य सदस्यता मिळते.
Visit : bahujannama.com