नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तिबेटचे बौध्द धर्मगुरु दलाई लामा यांनी पुन्हा आपल्या उत्तराधिकाऱ्यासंदर्भात सुतोवाच केले आहे. त्यांनी बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान म्हटले आहे की, माझी उत्तराधिकारी कोणतीही महिला असू शकते. जर एखादी महिला दलाई लामा बनत असेल तर ती आकर्षक असणे जरूरी आहे. कारण ती आकर्षक नसेल तर तिला पाहायला लोक येणार नाहीत.
दलाई लामा यांनी यापूर्वीही आपल्या उत्तराधिकाऱ्यासंदर्भात वक्तव्य केले होते. त्यांची उत्तराधिकारी महिला असू शकते असे त्यांनी सांगितले होते. तसेच त्यांचा उत्तराधिकारी भारतातूनही असू शकतो असे ते मुलाखतीदरम्यान म्हणाले होते.
दलाई लामा यांच्या मतानुसार युरोप फक्त युरोपीय लोकांसाठी असायला हवे. युरोपचे इस्लामीकरण होऊ शकत नाही. हा आफ्रीका बनू शकत नाही. असेही ते म्हणाले. त्याशिवाय एक दिवस ट्रंप काही बोलतात. मात्र त्यांच्यात नैतिक सिद्धांतांचा अभाव आहे. परंतु जेव्हा ट्रंप राष्ट्राध्यक्ष बनले होते. तेव्हा त्यांनी अमेरिका फर्स्ट असे म्हटले होते. हे चुकीचे आहे. अमेरिकेने वैश्विक जबाबदारी घेतली पाहिजे असे ते म्हणाले.