बहुजननामा ऑनलाईन टीम : मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या सीमाभागात दहशत बनलेली डाकू साधना पटेलला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. सतना पोलिसांनी साधना पटेलला कुरियनच्या जंगलांमधून अटक केली असून तिच्याकडून ३१५ देशी रायफल आणि ४ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. साधना पटेल हिच्यावर दोन्ही राज्यात दरोडे व अपहरणाचे अनेक गुन्हे दाखल होते, त्यावर २० हजार रुपयांचे बक्षीसही ठेवण्यात आले होते.साधना पटेल तिच्या घटनांबरोबर तिच्या प्रेम प्रकरणासाठीही चर्चेत होती.
दरोडेखोर साधना पटेलने दोन विवाह केले. तिचा कुटुंबीयांनी वयाच्या १७ व्या वर्षी भरतकूप गावात तिचे लग्न लावून दिले जे ६ महिनेदेखील टिकले नाही, यानंतर साधनाने स्वतःहून दुसरे लग्न केले, पण ते लग्न टिकू शकले नाही आणि त्यानंतर साधनेने बंदूक उचलली, आणि टोळीत सामील झाली. त्यानंतर तिचे टोळीच्या नेत्याशीच प्रेमसंबंध होते.दरम्यान साधनाच्या वडिलांवर यापूर्वीही डाकूंशी मैत्री असल्याचे आरोप होते, त्यामुळे त्यांच्या घरी दरोडेखोरांची ये -जा असल्याने साधनाची दरोडेखोरांशी ओळख झाली, यामुळेच वडिलांच्या मृत्यूनंतर फायदा घेत ती, दरोडेखोर नवल धोबी याच्या टोळीत सामील झाली. नवल धोबीच्या अटकेनंतर या टोळीची कमांड दीपक शिवहरे यांनी हाताळली, ज्याच्या साधना प्रेमात पडली.
साधना ही त्याची प्रेयसी झाली, त्यानंतर या दोघांनी त्यांच्या टोळीसह एकत्रित बर्याच घटना घडवून आणल्या ज्याने संपूर्ण परिसरात त्याच्या नावाची खळबळ उडाली. साधनाच्या अटकेबाबत पोलिस अधीक्षक रियाझ इकबाल म्हणाले की, सतना जिल्ह्यात तीन टोळ्या कार्यरत आहेत. एक बबली कोल, दुसरी साधना पटेल आणि एक गौरी यादव. यातील दोन टोळ्यांचा खात्मा करण्यात आला. काही महिन्यांपूर्वीच बबली टोळीचा खात्मा करण्यात आला , त्यानंतर आता पोलिसांनी साधना पटेल हिला ताब्यात घेतल्याने तिसरा टोळी काढून टाकली आहे. गेल्या १ महिन्यात या टोळीचे दोन मुख्य सदस्य, रिंकू शिवहरे आणि दीपक शिवहरे यांना अटक करण्यात आली होती.
Visit : bahujannama.com