वॉशिंग्टन : वृत्तसंस्था- अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये अंदाधुंद गोळीबाराची घटना उघडकीस आली असून या हल्यात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिका -मेक्सिको सीमेपासून ३५ किमी अंतरावर असलेल्या पॅराडाइज हिल येथे ही घटना उघडकीस आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ६.४९ च्या सुमारास घटनेसंदर्भात फोन आला. घटनास्थळी दाखल होताच गोळीबारात जखमी झालेले काही लोक आढळून आले. दरम्यान, संशयित आरोपी हा मृतांमधीलच एक असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
दरम्यान मृतांमध्ये तीन लहान मुलांचाही समावेश आहे. घटनास्थळी २९ वर्षांची एक महिला आणि ३१ वर्षांचा एक पुरुष आणि तीन वर्षीय मुलगा मृतावस्थेत आढळले. त्यानंतर जखमी अवस्थेत सापडलेल्या पाच आणि आणि नऊ वर्षांच्या दोन मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ११ वर्षांच्या एका मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Visit : bahujannama.com