बहुजननामा ऑनलाईन – आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाची किंमत ६० डॉलर वरून २० डॉलर प्रति बॅरलपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. तेलाची मागणी कमी होण्याची चिन्हे दिसत आहेत, ज्यामुळे त्याची किंमत कमी होऊन प्रति बॅरल ४५ डॉलर इतकी होईल. जर यात आणखीन घसरण झाली तर ३० डॉलर किंवा २० डॉलर प्रति बॅरलवर एवढी किंमत होऊ शकते. तथापि, ही परिस्थिती भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चांगली आहे.अशी माहिती रिअल व्हिजन समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राउल पैन यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. कच्च्या तेलाचा आंतरराष्ट्रीय बेंचमार्क मानला जाणारा ब्रेंट क्रूडची किंमत सध्या ६० डॉलर प्रति बॅरल आहे. तर वेस्ट टेक्सास इंटरमीडिएटची किंमत प्रति बॅरल सुमारे ५५ डॉलर आहे.
जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मंदीचा धोका
राउल पैन म्हणाले की, जागतिक अर्थव्यवस्थेवर मंदीचा धोका आहे. येणारा काळ आव्हानात्मक असू शकतो. बरेच देश यापूर्वीच मंदीच्या चपळ्यात आले आहेत. अमेरिकाही मंदीच्या दिशेने वाटचाल करत आहे. व्यापाराचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवरही झाला आहे. चीनही मंदीच्या धोक्यात अडकला आहे. भारताचा विकास दर घसरल्याची नोंद करण्यात आली आहे.
कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्याने भारताला मोठा दिलासा मिळणार
तथापि, कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्याने भारताला मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या भारत ८० टक्क्यांहून अधिक कच्च्या तेलाचा पुरवठा करण्यासाठी आयातीवर अवलंबून आहे. या आयातीवर मोठा महसूल खर्च होतो. कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्यामुळे त्याच्या आयातीवरील खर्च कमी होईल. यामुळे आर्थिक तूट कमी होण्यास मदत होईल. तेलाची किंमत कमी झाली तर बर्याच वस्तूंच्या किंमतीही कमी होतील. यामुळे महागाई कमी होईल. यामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळू शकते.