बहुजननामा ऑनलाईन – सर्वसामान्य माणूस भुक लागते तेव्हा अन्न खातो. मात्र कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही अशी एक व्यक्ती आहे जी गेल्या ४०-४५ वर्षांपासून काचा खात आहे.मध्यप्रदेशातील दिंडोरीमध्ये राहणारे दयाराम साहू गेल्या ४०-४५ वर्षांपासून काचा खाऊन आपले पोट भरत आहे.
व्यवसायाने वकील असणाऱ्या साहू यांनी आपल्या विचित्र सवयीबद्दल सांगितले की, ” मी फक्त चौदा- पंधरा वर्षाचा असताना मला ही सवय लागली. सुरवातीला मी दिवसभर एक किलो काचा चावत होतो. ही सवय माझ्यासाठी व्यसनाधीनतेसारखी आहे आणि यामुळे माझे दातही खराब झाले आहेत. मात्र तुम्ही असे कोणतेही प्राणघातक प्रयत्न करु नयेत.
ते तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते.”सुरवातीला त्यांच्या पत्नीलाही त्यांची ही सवय पाहून आश्चर्याचा धक्का बसला होता. तर या सवयीमुळे शरीराचे नुकसान होत असून ही सवय मोडण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली.