पुणे : बहुजननामा ऑनलाईन – येरवाडा कारागृहातील कैद्यांसाठी नव्यानी तयार केलेल्या कारागृहातून सकाळी दोन दरोडेखोरांनी पलायन केले आहे. यातील एकाने १५ दिवसांपूर्वी वायसीएम रुग्णालयातुन पलायन केले होते. मात्र वाकड पोलिसांनी त्याला १२ तासात अटक केली होती. हर्षद सय्यद आणि आकाश बाबुलाल पवार असे दोघा कारागृहातून पळून गेलेल्या दरोडेखोर आणि कुख्याताची नावे आहेत.
शनिवारी सकाळच्या सुमारास बाथरुमचा बहाणा करुन खिडकीतून दोघे पळाले आहेत.
आकाश पवार आणि हर्षध सय्यद या दोघांची काळाखडक परिसरात मोठी दहशत आहे. गेल्या महीन्यात 26 तारखेला पिंपरीतील वायसिएम हॉस्पिटलमधून पोलिसांशी भांडून आकाश पवार हा पळून गेला होता.