नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूची निर्मिती वटवाघूळामधून दुसर्या प्राण्यांमार्फत मानवांमध्ये पोचल्याचे सांगितले गेले आहे. आतापर्यंत प्राण्यांमध्ये कोरोना संसर्गाच्या काहीशा घटनाच समोर आल्या आहेत. परंतु आता अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातील (यूसी) डेव्हिसच्या शास्त्रज्ञांनी एका नवीन अभ्यासात असा दावा केला आहे की, कोरोना साथीच्या आजारामुळे प्राण्यांच्या अनेक प्रजाती प्रभावित होऊ शकतात. या अभ्यासानुसार, कोरोना विषाणू महामारीच्या धोक्याचा सामना करणारी एकमेव अशी मनुष्य प्रजाती नाही तर अनेक जातींच्या प्राण्यांनाही जास्त धोका आहे.
एसीई -2 रिसेप्टर प्रोटीनच्या संरचनेची तुलना करण्यासाठी वैज्ञानिकांनी जीनोम विश्लेषणाचा वापर केला. कोरोना विषाणू याचा वापर माशासह, सरपटणारे प्राणी आणि स्तनधारी प्राण्यांच्या 410 विविध प्रजातींच्या पेशींमध्ये प्रवेश करण्यासाठी करतो. पीएनएएस या संशोधन जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, एसीई -2 सामान्यत: तोंड, नाक आणि फुफ्फुसांच्या बाह्य थर व्यापणार्या पेशींसह अनेक प्रकारच्या पेशी आणि ऊतींमध्ये आढळते. अभ्यासाचे आघाडीचे लेखक हॅरिस लेविन आशा करतात की, हे त्या प्रतिक्रियांना प्रेरणा देईल, जे साथीच्या वेळी प्राणी आणि मानवी आरोग्याचे संरक्षण करतात.
या अभ्यासानुसार, पाश्चात्य गोरिल्ला, ओरंगुटन्स आणि गालावर पांढरे केस असलेले काळे लंगूर यासारख्या अनेक गंभीर प्रजातींना विषाणूची लागण होण्याची शक्यता आहे. ते संक्रमणास बळी पडू शकतात. दुसरीकडे ग्रे व्हेल आणि बॉटलोनोज डॉल्फिन तसेच चिनी हॅमस्टरसारख्या सागरी स्तधारी प्राण्यांनाही कोरोना विषाणूचा धोका आहे. शास्त्रज्ञ म्हणतात की, मांजरी, गुरेढोरे आणि मेंढ्या आणि पाळीव प्राण्यांमध्ये कोरोना साथीचा धोका कमी असतो. कुत्री, घोडे आणि डुकरांना कमी धोका आहे. हा अभ्यास उघडकीस आल्यानंतर हे स्पष्ट झाले आहे की, केवळ मानवांनाच कोरोना संसर्गाचा धोका असतोच असे नाही, तर प्राणी देखील या विषाणूमुळे प्रभावित होऊ शकतात.