नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूने ग्रस्त असलेले बहुतेक लोक पुरुष आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार पुरुषांच्या तुलनेत भारतात कमी महिला कोरोनो विषाणूमुळे मरत आहेत. देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांपैकी निम्मे लोक ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. या प्राणघातक विषाणूमुळे आतापर्यंत १,०७४ लोकांचा जीव गेला आहे, त्यात ६५% पुरुष आहेत.
नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार सांगितले गेले होते की पुरुष आणि स्त्रियांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा समान धोका आहे, परंतु पुरुषांमध्ये गंभीर परिणाम आणि मृत्यूचा जास्त धोका असतो. कोविड – १९ ने संक्रमित वृद्ध पुरुषांना अतिरिक्त काळजी घेणे गरजेचे आहे. आधीच्या संशोधनात असे सांगितले गेले होते की वृद्ध, मधुमेह आणि उच्च रक्तदाब यासारख्या आजारांनी ग्रस्त लोकांना कोविड – १९ मुळे मृत्यूचा धोका जास्त असतो.
ब्रिटन, चीन, अमेरिकेतही महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या मृत्यूचा आकडा दुप्पट
पण इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोना विषाणूमुळे मरण पावलेल्या लोकांची टक्केवारी कमी आहे, तर देशात या आजाराच्या मृत्यूचे प्रमाण ३.२% आहे. मंत्रालयाने सांगितले की देशातील एकूण ३३,०५० संक्रमित लोकांपैकी ८३२४ लोक बरे झाले असून, भारतात कोरोना संक्रमित रूग्णांचा रिकव्हरी रेट २५.१९% आहे.
भारतात संक्रमण होणाऱ्या पुरुषांचे प्रमाण ७६ टक्के आणि स्त्रियांचे २४ टक्के आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार पुरुषांच्या मृत्यूचे प्रमाण ६५ टक्के आणि महिलांच्या मृत्यूचे प्रमाण ३५ टक्के आहे. ब्रिटन, चीन आणि अमेरिकेतही पुरुषांच्या मृत्यूची संख्या महिलांपेक्षा दुप्पट आहे.
कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या ५१ टक्के लोकांचे वय ६० पेक्षा जास्त
आरोग्य मंत्रालयाच्या मते कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांमध्ये ४५ वर्षे वयोगटातील १४ टक्के, ४५-६० वयोगटातील ३४.८ टक्के रुग्ण शामिल आहेत. याव्यतिरिक्त कोरोना विषाणूमुळे मरण पावलेल्यांपैकी निम्म्याहून अधिक रुग्णांचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त आहे.
कोरोना विषाणू ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या रुग्णांना आपला शिकार बनवत असून आरोग्य मंत्रालयाच्या मते कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ५१.३ टक्के रुग्णांचा समावेश आहे. ६० वर्षापेक्षा जास्त वयामध्ये ६०-७५ वर्षे वयोगटातील ४२% आणि ७५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ९.२% रुग्णांचा समावेश आहे.
एनपीन्यूज24 नेटवर्क