श्रीनगर : वृत्तसंस्था – जम्मूमधील ऊधमपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. आपल्याला साधा खोकला आला तर आपण डॉक्टर कडे न जाता मेडीकल मधून एक सिरप घेतो. परंतु, असे केल्यामुळे ९ लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. सिरपमधील विषारी पदार्थामुळे ९ लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. Coldbest-PC असे विष आढळलेल्या कफ सिरपचे नाव आहे. या दुर्घटनेनंतर जवळपास ८ राज्यात या कफ सिरपच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. चंदीगडच्या PGIMER अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उधमपूरच्या जिल्ह्यातील मुलांचा मृत्यू हा Coldbest-PC या कफ सिरपमधील Diethylene Glycol या विषारी पदार्थामुळे झाला आहे. या कफ सिरपमध्ये विषारी पदार्थ असल्याचे निदर्शनास आल्यानंतर जवळपास आठ राज्यातून हे सिरप परत मागवण्यात आले. हे सिरप सिरमौर जिल्ह्यातील तयार होत असून सध्या ते बनवण्यावर बंदी घातली गेली आहे.
जम्मू-काश्मीरच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक औषध नियंत्रक सुरिंदर मोहन यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कफ सिरप हिमाचल प्रदेशातील Digital Vision नावाची औषध कंपनी बनवते. जम्मूच्या डॉ. रेनू शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या ९ लहान मुलांचा मृत्यू डिसेंबर २०१९ शेवटचा आठवडा ते १७ जानेवारी दरम्यान झाला. या सर्व मुलांना Acute renal failure च्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र दुर्देवाने त्यांचा मृत्यू झाला.
या सर्वांचा मृत्यू Coldbest-PC या कफ सिरपमुळे झाल्याचे निदर्शनास आले (poison in Cough syrup) होते. या सिरपच्या पुढील चाचणीसाठी जम्मूजवळील इंडियन इंस्टीट्यूट ऑफ इंटीग्रेटीव मेडिसिन तसेच चंदीगडच्या औषध तपासणी लॅबमध्ये पाठवण्यात आले आहे. यात Diethylene Glycol नावाचा विषारी पदार्थ आढळला आहे. दरम्यान अद्याप याबाबतचा अंतिम रिपोर्ट आलेला (poison in Cough syrup) नाही.