नागपूर: बहुजननामा ऑनलाईन – कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत चालला आहे. दिवसेंदिवस परिस्थिती कठीण होत चालली आहे. अशातच नागपूरमधून एक घटना समोर आली आहे. एका रुग्णालयात कोरोनाबाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रुग्णालयाने त्या महिलेचा मृतदेह नियमानुसार नातेवाईकांना देण्यास नकार दिल्याचा कारणावरून पतीसह नातेवाईकांनी रुग्णालयात तोडफोड करत रिसेप्शन काउंटर जाळले. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून याप्रकरणी पोलिसांनी १०जणांना अटक केली असल्याची माहिती नागपूरचे पोलीस उपायुक्त लोहीत मटानी यांनी दिली.
या कोरोनाबाधित महिलेला होप रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. नातेवाईकांनी मृत्यूनंतर महिलेचा मृतदेह देण्याची मागणी रुग्णालय प्रशासनाकडे केली. मात्र, नियमानुसार रुग्णालयाने मृतदेह देण्यास नकार दिला. त्यावरून हा प्रकार घडला. रुग्णालयातील डॉक्टरांशी मृतदेह सुपूर्द करण्यावरून मयत महिलेच्या पतीने वाद घातला. मृतदेह रुग्णालय देत नसल्याने पतीसह महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या रिसेप्शन काऊंटरजवळ येऊन साहित्याची नासधूस केली. तर एका व्यक्तीने रिसेप्शन काऊंटरवरला आग लावली. दरम्यान, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान साधत आग विझवली. पोलिसांनी रुग्णालयात धुडगुस घालत साहित्याची तोडफोड केल्याप्रकरणी ११ जणांवर गुन्हा दाखल केला असून, त्यापैकी १० जणांना अटक केली आहे.
नागपुमधील कोरोना स्थिती
रविवारी नागपूरमध्ये ४ हजार ११० जणांचा कोरोना चाचणी अहवाल बाधित म्हणून आला आहे. तर ३ हजार ४९७ रुग्ण दिवसभरात कोरोनामुक्त झाले आहेत. ६२ जणांचा मृत्यू झाला आहे.
बाधितांची संख्या २ लाख ४१ हजार ६०६ वर पोहोचली असून, १ लाख ९४ हजार ९०८ जण करोनामुक्त झाले आहेत. तर एकूण मृत्यू ५ हजार ३२७ झाले आहेत .
#WATCH | Relatives of a woman, who died due to COVID19 at a hospital in Maharashtra's Nagpur, vandalised the reception area and tried to set it on fire, yesterday.
(Visuals from the CCTV footage at the hospital) pic.twitter.com/9WUyAM4EOC
— ANI (@ANI) April 4, 2021