नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – मुंबई, पुणे, ठाणे नंतर नागपूरमध्ये कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. राज्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला असून, नागपूरमधील मेयो रुग्णालयातून कोरोनाचे ४ संशयित रुग्ण पळून गेले आहेत त्यामुळे प्रशासनाची गडबड उडालेली आहे.
नागपूरमध्ये कोरोना बाधित रुग्णाच्या बायकोची आणि भावाची देखील कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याने नागपूरमधील कोरोना रुग्णांची संख्या ३ वर पोहोचली आहे. रुग्णाला कोरोना झाला म्हणून, त्याच्या नातेवाईक, मित्र आणि उपचार करणारे डॉक्टर आणि डॉक्टरांच्या हाताखाली काम करणारे माणसे असे १७ जणांची तपासणी गुरुवारी मेयो हॉस्पिटलमध्ये करण्यात आली आहे.
१७ मधील १५ रिपोर्ट हे निगेटिव्ह आले असून रुग्णाच्या पत्नीचे व भावाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत. ही माहीती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली. शुक्रवारी दुपारी ४ रुग्ण तपासणीस मेयो रुग्णालयात आले होते पण, त्यांचे रिपोर्ट रात्री १२ वाजून गेल्यानंतरही न आल्यामुळे ते ४ संशयित रुग्ण आपापल्या घरी गेले. सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यामुळे रुग्णालय प्रशासनात एकच गडबड उडाली असून, आता त्या रुग्णांना रुग्णालयात आणले जात आहे. ४ संशयित रुग्ण हे नागपूरमधील आहेत.