बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोना व्हायरसचा प्रकोप वाढला असून या व्हायरसचा परिणाम मौल्यवान धातूंच्या किंमतीवर होत आहे. स्थानिक बाजारात सोन्याचा भाव शुक्रवारी १,५०० रुपये प्रति १० ग्रामने खाली आला असून चांदीच्या भावात ३,००० रु. प्रति किलोपेक्षा जास्त घट झाली आहे. कोरोना व्हायरसमुळे स्थानिक शेअर बाजारात सुरुवातीच्या व्यवहारांमध्ये घट झाल्यानंतर जबरदस्त रिकव्हरी आली. पण सोने-चांदीमध्ये कमकुवत परदेशी संकेतांचा दबाव कायम राहिला आहे.
मागच्या ४ दिवसात सोन्यात १९५ डॉलरपेक्षा जास्त घसरण
आंतरराष्ट्रीय बाजारातही कोरोना व्हायरसचा परिणाम दिसून येत असून सोन्याचा भाव या वर्षीच्या खालच्या स्तरावर आला असताना मागच्या चार दिवसात सोन्याच्या दरात १९५ डॉलर प्रति औसपेक्षा अधिक घट झाली आहे. रात्री ९.४५ वाजता मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या एप्रिल अनुबंधात मागील सत्राच्या तुलनेत १,५३६ रु. म्हणजे ३.६४ टक्के घसरणीसह ४०,६७० रु. प्रति ग्रामवर व्यवहार करत होता. तर यापूर्वी व्यवहारादरम्यान सोन्याचा भाव ४०,४१६ रु. प्रति १० ग्रामने खाली आला असून चांदीच्या मे महिन्याच्या अनुबंधात मागच्या सत्राच्या तुलनेत २,९९३ रुपये म्हणजे ६.७८ टक्के घसरणीसह ४१,१४६ रु. प्रति किलो व्यवहार करत होता. तसेच यापूर्वी व्यवहाराच्या दरम्यान चांदी ४०,९०० रुपये प्रति किलोपर्यंत खाली आली.
तसेच आंतरराष्ट्रीय वायदा बाजार कोमेक्समध्ये सोन्याच्या एप्रिल अनुबंधात मागच्या सत्रापासून ७७.४० डॉलर म्हणजे ४.८७ टक्के घसरणीसह १,५१२.९० डॉलर प्रति औसवर व्यवहार करत होता. पण याअगोदर व्यवहार करताना सोन्याचा भाव १,५०७.८० डॉलर प्रति औंसने खाली आला असताना ९ मार्चला कॉमेक्सवर सोन्याचा भाव १,७०४ डॉलर प्रति औंसने उसळला होता. कॉमेक्सवर चांदीच्या मे अनुबंधात मागील सत्राच्या तुलनेत ८.४० टक्के घसरणीसह १४.६६ डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत होता.