नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणू अपेक्षेपेक्षा जास्त काळ मानवी शरीरात राहू शकतो. अलीकडील प्रकरणांमध्ये असे आढळले आहे की हा धोकादायक विषाणू मानवी शरीरात अनेक आठवडे आणि काही प्रकरणांमध्ये काही महिन्यांपर्यंत राहू शकतो.
चार्ल्स पिगनल (वय ४२) यांच्यात व्हायरसची लक्षणे आढळल्यानंतर ४ मार्चला कोरोनाने संक्रमित असल्याची पुष्टी झाली. रूग्णालयात दोन दिवस असताना त्यांना ना खोकला आला ना ताप आला. पिगनल यांना बरे वाटत होते व त्यांना कोरोनाची केवळ सौम्य लक्षणे असल्याचे जाणवले होते.
परंतु कोणतीही लक्षणे नसताना पिनगल पाच आठवड्यांनंतर पुन्हा एकदा तपासात पॉजिटीव्ह आढळले. अखेर तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आल्यावर ४० दिवसानंतर सिंगापूर येथील नॅशनल सेंटर फॉर इन्फेक्शियस डिजीजच्या आयसोलेशन वॉर्डमधून त्यांना सोडण्यात आले आहे. २४ तासात केलेल्या दोन तपासणीत त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आणि त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने त्यांना डिस्चार्ज दिला.
पिगनल सारखी प्रकरणे जगभरातून समोर येत आहेत. जगभरातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी काही रुग्णांच्या शरीरामधून हा विषाणू का संपत नाही, याबद्दल हैराण आहेत. तेही तेव्हा, जेव्हा हे रुग्ण इतर कोणत्याही आजाराने ग्रस्त नाहीत.
दक्षिण कोरियामध्ये नुकत्याच झालेल्या निष्कर्षांमध्ये असे आढळले आहे की कोविड-१९ पासून बरे झाल्यानंतरही विषाणूचे मृत तुकडे काही महिन्यांपर्यंत शरीरात राहू शकतात. पिगनल कामाच्या निमित्ताने मार्चच्या सुरुवातीला लंडनला गेले होते आणि त्यांना असे वाटत आहे कि त्यांना तेथेच विषाणूची लागण झाली आहे.
रुग्णालयात काही दिवस घालवल्यानंतरच त्यांना बरे वाटू लागले आणि नंतर त्यांनी आपल्या आईला सांगितले की इथून बरे होऊन ते काही दिवसात घरी परत येतील. परंतु त्याचे परिणाम पॉजिटीव्हच दिसू लागले, त्यानंतर त्यांनी आपल्या डॉक्टरांना विचारले कि अजूनही ते संक्रमित आहेत का ? डॉक्टर म्हणाले की आम्हाला याबद्दल पूर्णपणे माहिती नाही, परंतु तुमच्यात जी लक्षणे आहेत ती संक्रामक आहेत की नाही याचा काही पुरावा नाही.
रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्रांच्या मते, कोरोना विषाणू बरा होण्यासाठी, रुग्णाला ७२ तास ताप येऊ नये. याव्यतिरिक्त, व्यक्तीच्या श्वसन आरोग्यामध्येही सुधार दिसला पाहिजे आणि २४ तासांच्या दरम्यान त्याचे दोन चाचणी अहवाल निगेटिव्ह आले पाहिजेत.