मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – देशातील विविध राज्यांत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा सर्वाधिक आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 25,681 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 14,400 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, यामध्ये 70 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Maharashtra reports 25,681 new #COVID19 cases, 14,400 recoveries and 70 deaths in the last 24 hours.
Total cases 24,22,021
Total recoveries 21,89,965
Death toll 53,208Active cases 1,77,560 pic.twitter.com/2MVztDU6sM
— ANI (@ANI) March 19, 2021
महाराष्ट्रात आत्तापर्यंत 24,22,021 जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी 21,89,965 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सध्या कोरोनाचे 1,77,560 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मात्र, आत्तापर्यंत 53,208 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय राज्यात सध्या 8,67,333 रुग्ण होम क्वारंटाईन असून, 7848 जणांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आले आहे, अशी माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
पुण्यात सर्वाधिक रुग्ण
पुण्यात (शहर आणि जिल्हा) आत्तापर्यंत 4,60,114 प्रकरणे समोर आली आहेत. यामध्ये 4,14,514 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 8167 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुण्यात सध्या 37,384 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
मुंबईतही वाढतीये कोरोनाबाधितांची संख्या
मुंबई, पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंबईत आत्तापर्यंत 3,55,914 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यामध्ये 3,24,584 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 11,569 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या 18,850 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.