बहुजननामा ऑनलाईन टीम – कोरोना रुग्णांच्या शेजारीच एक मृतदेह तब्बल 11 तास पडून असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयातील हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ भाजपा आमदार नितेश राणे आणि काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी ट्विटरला शेअर केला आहे.
After Sion hospital, this is Rajawadi hospital of Ghatkopar where deadbody is lying for hours in an open patient ward.#BMC officials incharge particularly the dean of the hospital must be sacked immediately for this inhuman act.#Shamefull #COVID19 pic.twitter.com/N5HicGt07w
— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) May 24, 2020
व्हिडीओमध्ये मृतदेह एका प्लास्टिग बॅगमध्ये ठेवण्यात आल्याचे दिसत आहे. यावेळी मृतदेहाच्या शेजारी एक महिला रुग्ण असून इतर रुग्ण आहेत. हा व्हिडीओ मृतदेह ठेवण्यात आलेल्या शेजारील बेडवर असणार्या महिला रुग्णाने शूट केलेला आहे. महिलेने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे या महिलेचा मृत्यू झाला आहे. महिला शेवटच्या क्षणी पाणी मागत असतानाही तिला कोणी कर्मचारी पाणी देण्यासाठी आला नव्हता असा दावाही तिने केला आहे. 10 ते 12 तासांपासून हा मृतदेह येथे पडून आहे. या लोकांनी मृतदेहाला प्लास्टिकमध्ये कव्हर करुन ठेवले होते. यांच्यामुळे आमच्या जीवाला धोका आहे. अजूनपर्यंत एकही कर्मचारी आलेला नाही. आम्हाला अन्न, पाणी काहीच जात नाही.
दरम्यान, यासंदर्भात रूग्णालयाने स्पष्टीकरण दिले आहे. रुग्ण बरे व्हावेत यासाठी आम्ही अथक प्रयत्न करत असून दिवस-रात्रा काम करत आहोत. करोनाविरोधात आम्ही रोज लढत आहोत. नातेवाईक उशिरा येत असल्याने किंवा कोणीच जबाबदारी घेत नसल्याने अनेकदा मृतदेह 40 ते 45 मिनिटे किंवा एक तास बेडवर पडून असतो. काहीजण आम्हाला मृतदेह नको असल्याचे सांगतात. असे राजावाडी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विद्या ठाकूर यांनी सांगितले आहे.