नवी दिल्ली : वृत्त संस्था – भारतीयांची ताकद जगाला दाखविण्यासाठी ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता मला ९ मिनिटे द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात सांगितले की, २२ मार्च ला ज्या पद्धतीने आपण सर्व देशवासियांची शक्तीचे दर्शन दाखवून दिल.
तसेच़ ५ एप्रिल रोजी रविवारी रात्री ९ वाजता मी आपल्याकडे ९ मिनिटे मागत आहे. आपण सर्वांनी घरातील सर्व दिवे बंद करुन गॅलरीत या व हातात मेणबत्ती, बॅटरी, मोबाईलचा फ्लॅश लाईट लावून आपली महाशक्ती जगाला दाखवून द्यावी. देशभरातील १३० कोटी आपल्या पाठीशी आहे. प्रकाशाचा हा उत्सव दाखवून देऊ.
देशभरातील लॉक डाऊनला ५ एप्रिलला ९ दिवस पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने सर्वांना पुन्हा एकदा एकत्रित आणून त्यांनी या लॉक डाऊनचे पालन करावे, यासाठी मोदी यांनी देशवासियांना हे भावनिक आवाहन केले आहे.