बहुजननामा ऑनलाइन टीम – जीवन आवश्यक वस्तूच्या ट्रक चालकाचा खुनासह दरोड्याचा गंभीर गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 48 तासात उघडकीस आणला आहे. आरोपीनी लघुशंकेसाठी चालक थांबल्यानंतर त्याच्यावर सपासप वार केले होते. तर क्लिनर आणि आणखी एकावर वारकरून त्यांच्याजवलील मौल्यवान ऐवज नेला होता.
गणेश अजिनाथ चव्हाण (वय 22) आणि समीर उर्फ सूरज किरण भोसले (वय 19, रा. दौड) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. तर त्यांच्या साथीदारांचा शोध सुरू आहे. या घटनेत काशिनाथ रामभाऊ कदम (वय 55, रा. ढोकी, जि. उस्मानाबाद) असे खून झालेल्याचे नाव आहे. तर यात मोहम्मद मेहबूब पठाण (वय 44) आणि शकील आयुब शेख (वय 35) हे दोघे जखमी झाले आहेत.
कदम हे त्यांच्या माल वाहतूक ट्रक लातूर वरून घेऊन पुण्यातील मार्केटयार्ड येथे येत होते. दरम्यान लघुशंकेसाठी ते दौड रेल्वे हद्दीत पुणे सोलापूर महार्गावर थांबले होते. यावेळी 5 ते 6 जण पाई चालत आले. त्यांनी अचानक पाठीमागून येऊन कदम यांच्यावर सपासप वार केले. तसेच त्यांच्या खिशातील ऐवज घेऊन पसार झाले. तर त्यांच्या ट्रक समोरच उभा असणाऱ्या फिर्यादी यांना देखील धमकावत वार करून लुटले. आरोपी पसार झाल्यानंतर कदम यांना रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात असताना त्यांचा वाटेत मृत्यू झाला. याबाबत शकील शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दौड पोलीस ठाण्यात खून व दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हयचा तपास स्थानिक गुन्हे शाखा करत होतज. त्यावेळी एलसीबीने वेषांतर करून पुणे, अहमदनगर तसेच सोलापूर येथे जाऊन माहिती घेतली. त्यावेळी दोन आरोपीबाबत माहिती मिळली. त्यानुसार त्या दोघांना ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्या साथीदारांचा शोध सुरू आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक पद्माकर घनवट, सहायक निरीक्षक गुंड, अनिल काळे, सुभाष राऊत, रवी कोकरे, महेश गायकवाड यांच्या पथकाने केली.