बहुजननामा ऑनलाइन टीम – पुणे विभागातील 4 लाख 75 हजार 813 कोरोना(Coronavirus) बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 8 हजार 258 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 18 हजार 196 इतकी आहे. कोरोनाबाधीत(Coronavirus) एकुण 14 हजार 249 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.80 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 93.62 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 25 हजार 984 रुग्णांपैकी 3 लाख 6 हजार 674 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 11 हजार 417 आहेत. कोरोनाबाधित एकूण 7 हजार 893 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.42 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.08 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 47 हजार 169 रुग्णांपैकी 43 हजार 104 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 485 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 580 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 41 हजार 265 रुग्णांपैकी 37 हजार 587 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 202 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 476 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 45 हजार 505 रुग्णांपैकी 42 हजार 546 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 307 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 652 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 48 हजार 335 रुग्णांपैकी 45 हजार 902 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 785 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 648 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 371 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 772, सातारा जिल्ह्यात 237, सोलापूर जिल्ह्यात 187, सांगली जिल्ह्यात 111 तर कोल्हापूर जिल्ह्यात 64 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण –
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 1 हजार 678 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयामध्ये 729 ,सातारा जिल्हयामध्ये 424, सोलापूर जिल्हयामध्ये 147, सांगली जिल्हयामध्ये 177 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 201 अशा रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 24 लाख 49 हजार 357 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 8 हजार 258 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 4 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )