Yerawada Jail News | पुणे: महिलेसोबत असभ्य वर्तन, येरवडा कारागृहातील घटना

June 29, 2024

पुणे :  – Yerawada Jail News | नातेवाईक असल्याचे बनावट कागदपत्र घेऊन येरवडा कारागृहात बंदी असलेल्या आरोपींना भेटण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीने महिलेसोबत असभ्य वर्तन करुन विनयभंग केल्याची घटना घडली आहे (Molestation Case). ही घटना शुक्रवारी (दि.28) सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास येरवडा कारागृहात घडली आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी (Yerawada Police Station) एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत 42 वर्षीय महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. त्यानुसार जहीर बाबा लहूरी (रा. नाना पेठ, एडिगम चौक, आयना मस्जिद शेजारी, पुणे) याच्यावर आयपीसी 354 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलाचा सहा महिन्यापूर्वी खुन झाला आहे. या गुन्ह्यातील आरोपी सध्या येरवडा कारागृहात आहेत.

या गुन्ह्यातील आरोपींना जहीर हा भेटण्यासाठी जाणार असल्याचे फिर्यादी यांना समजले. त्यामुळे फिर्य़ादी शुक्रवारी सकाळी येरवडा कारागृहात गेल्या. त्यांनी येरवडा कारागृहात जाऊन तेथील कर्मचाऱ्यांची भेट घेतली. फिर्यादी यांनी येरवडा कारागृहातील अधिकाऱ्यांना सांगितले की, आरोपींना भेटण्यासाठी आलेला जहीर लहूरी हा आरोपींचा कोणीही नातेवाईक नाही. तो खोट्या कागदपत्राच्या आधारे आरोपींना भेटायला आला आहे. त्यामुळे कारागृहातील कर्मचाऱ्यांनी जहीर लहूरी याच्याकडे चौकशी करत असताना त्याने फिर्यादी महिलेसोबत असभ्य वर्तन करुन विनयभंग केला. तसेच फिर्य़ादी यांना धक्का देऊन पळून गेला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.