नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमधील कोरोना व्हायरसची दहशत पसरत असून अशातच आता चीनच्या वुहान येथील शहरात कोरोनाची लागण अवघ्या नवजात मुलाला झाली आहे. तर बाळाचा जन्म झाल्यानंतर ३० तासातच त्याला कोरोना झाला असल्याचे समजले, अशी माहिती चीनच्या अधिकृत माध्यमांकडून मिळत आहे. हे नवजात आतापर्यंत सर्वात संक्रमित रुग्ण असून या विषाणूमुळे चीनमध्ये ५६३ लोकांचा मृत्यू झाला आहे.
या नवजात बाळाचा आईच्या गर्भाशयात किंवा जन्मानंतर लगेचच संसर्ग होण्याची शक्यता असताना नवजात मुलाला जन्म देण्यापूर्वी आईचा अहवाल हा सकारात्मक आला होता. पण हा ‘व्हर्टिकल ट्रान्समिशन’चा प्रकार असू शकतो, ज्यामध्ये गरोदरपणात किंवा जन्मानंतर संक्रमित आईपासून मुलापर्यंत संसर्ग पसरतो, असे तज्ञांचे मत आहे.
डिसेंबरमध्ये वुहान शहरातील बाजारपेठेतून हे संक्रमण पसरण्यास सुरवात झाली असून त्या बाजारात वन्य प्राणी विकले जातात. चीनमधून इतर ठिकाणी जाणाऱ्या लोकांमध्ये हे संक्रमण वेगाने पसरले. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने मंगळवारी सांगितले की व्हायरसची लागण होणारी सर्वात वृद्ध व्यक्ती 90 वर्षांची होती, अशी माहिती चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगानुसार समोर आली आहे.